सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका, सुशांतच्या संबंधामुळे दिशाचा मृत्यूचीही CBI चौकशी झाली पाहिजे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीला केंद्राने मान्यता दिली आहे. बिहार सरकारच्या आदेशानुसार केंद्राने हा तपास सीबीआयकडे सोपविला आहे. दरम्यान, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यात मागणी केली आहे कि, सुशांतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूचीही कोर्टाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशी करावी. या दोन्ही मृत्यूंचा एकमेकांशी संबंध असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

दोन्ही प्रकरणांवर उद्भवणारे प्रश्न

दरम्यान, 14 जून रोजी वांद्रे येथील अपार्टमेंटमध्ये सुशांतचा मृतदेह आढळला. त्याचवेळी, त्याची माजी मॅनेजर दिशाने 8 जून रोजी इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान, दोन्ही प्रकरणांमध्ये विविध प्रश्न उद्भवत आहेत.

संशयाच्या भोवऱ्यात रिया चक्रवर्ती

सुशांत सिंहच्या आत्महत्या प्रकरणात त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती संशयाच्या भोवऱ्यात आहे. दिवंगत अभिनेत्याचे वडील के.के. सिंग यांनी पटनामध्ये रियाविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. त्यांनी रियावर फसवणूक आणि सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे खळबळजनक आरोप केले आहेत. यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बिहार पोलिसांच्या पथकाने मुंबई गाठली आहे, परंतु मुंबई पोलिसांकडून केलेल्या तपासणीत या पथकाला पाठिंबा नव्हता असा आरोप केला जात आहे. येथूनच मुंबई पोलिसही प्रश्नाच्या कचाट्यात अडकले आहे आणि मग सामान्य लोकांनी तसेच सर्व अभिनेत्यांनीही सोशल मीडियावर सीबीआय चौकशीची मागणी उपस्थित केली.

रियाच्या याचिकेवर सुनावणी

सद्यस्थितीत सर्वोच्च न्यायालय रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. सुशांतच्या खटल्याची चौकशी पटना येथून मुंबई येथे हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे.