Weight Loss | ‘या’ ज्यूसचे सेवन करून, पोटाची चरबी करा कमी; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – हल्ली फास्ट फूड (Fast Food) खाण्याचे प्रमाण वाढत चालले आहे आहे. त्यामुळे त्याचे वाईट परिणाम आपल्या शरीरावर होत असतात. (Weight Loss) तसेच बाहेरच्या अति खाण्यामुळे वजन वाढीचा त्रासही होतो. वजन कमी करण्यासाठी काहीजण अनेक उपाय करतात. तर आज आम्हीही तुम्हाला वजन कमी (Weight Loss) करण्यासाठीचे काही पेय सांगणार आहोत. (Homemade Juice For Burning Belly Fat)

 

1. डाळिंबाचा रस (Pomegranate Juice)
डाळिंब हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये झिंक (Zinc), पोटॅशियम (Potassium), फायबर (Fiber), ओमेगा-6 (Omega-6) असे अनेक पोषक घटक असतात. हे सगळे घटक तुम्ही करत असलेल्या व्यायामाचा प्रभाव वाढविण्यास मदत करू शकतात.(Weight Loss)

 

2. हिरव्या भाज्यांचा रस (Green Vegetables Juice)
तुम्ही तुमच्या आवडत्या हिरव्या भाज्या जसे की आवळा, पालक, ब्रोकोली, कारले इत्यादींचा ज्यूस घरीच बनवून पिऊ शकता. हिरव्याभाज्यांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. जे तुमचे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामध्ये असलेले फायबर तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले ठेवते.

 

3. बीट रस (Beetroot Juice)
बीट मध्ये असलेले लोह आपल्या शरीरातील रक्ताची अनियमितता सुधारण्यास मदत करू शकते आणि आपली त्वचा देखील निरोगी बनवू शकते. परंतु, त्यात असलेले प्रथिने आणि फायबरचे प्रमाण तुमच्या वजन कमी करण्याच्या दिनचर्यासाठी खूप फायदेशीर आहे.

4. ओरेगॅनो रस (Oregano Juice)
तुम्ही घरच्या घरी अजवाइनचा रस सहज बनवू शकता. आयुर्वेदातही हे पोटासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यात उपस्थित थायमोक्विनोन नावाच्या सक्रिय घटकामध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. हे आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करू शकते. याच्या सेवनाने पोटावरील चरबी कमी करता येते.

 

5. आले आणि लिंबाचा रस (Ginger And Lemon Juice)
आले आणि लिंबू दोन्ही रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्याचे काम करतात. यासोबतच ते शरीरातील चयापचय गती देखीलवाढवते.
त्यामुळे शरीरात अन्न चांगले पचते आणि चरबी तयार होत नाही. याचे दररोज सेवन करून तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
\त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Weight Loss | homemade juice for burning belly fat obesity weight pomegranate vegetable beetroot ajwain garlic lemon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | हडपसर-मुंढवा रोडवर तरूणाचा खून ! CCTV फुटेजमध्ये मर्डरचा ‘थरार’ कैद

 

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर