पिंपरी : आठ कोटी ८८ लाख ७६ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता 

पिंपरी :  पोलीसनामा ऑनलाईन

भोसरी येथील नवीन रुग्णालयाकरिता आवश्यक असणारे हाय प्रेशर ऑटोक्लेव खरेदी करण्यासाठी येणाऱ्या सुमारे  १३  लाख  ५० हजार रुपयांच्या खर्चा सस्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.  स्थायी  समिती  सभागृहात  आज  झालेल्या  या  सभेच्या  अध्यक्षस्थानी  ममता  गायकवाड होत्या.

मनपाच्या विद्युत विभागाकडील अ क्षेत्रिय कार्यालय व इतर आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही  यंत्रणा बसविण्यासाठी येणाऱ्या सुमारे ७९ लाख ६२ हजार रूपयांच्यां खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

कार्यशाळा विभागामार्फत मनपा कडील विविध विभागाचे वापरात असलेली हैड्रोलिक लॅडर,डंपर प्लेसर,बी.आर.सी. मैला टँकर,जेटींग मशीन,गुरेवाहक,कारकस व्हॅन,ट्री कटींग,कॉम्पॅक्टर व टिप्पर वाहन त्याची दुरस्ती करण्यासाठी येणाऱ्या सुमारे ९५ लाख ०३ हजार रूपयांच्यां खर्चास  स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

पुणे : फक्त चार मिनटे वाचवण्यासाठी आरोपी बनणार का?

मनपा कार्यक्षेत्रामध्ये वृक्षारोपणासाठी उद्यान विभागासाठी २ मीटर उंचीची २५०० रोपे पुरविणेकामी येणाऱ्या सुमारे १५ लाख ७१ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

औंध रावेत रस्त्यावरील साई चौक येथील पुलास बाधा करणारी अति उच्चदाब वीज वाहिनी  हलविण्यासाठी  व  त्यासाठी  सुपरव्हिजन  शुल्क  सुमारे ५३लाख ६३ हजार रूपये महापारेषणला अदा करण्यास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

[amazon_link asins=’B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3220729e-b12a-11e8-99a6-d7fcfcfc3328′]

अ प्रभाग कार्यक्षेत्रातील आवश्यक चौकामध्ये सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी येणाऱ्या सुमारे ६५ लाख ३१ हजाररूपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

काळेवाडी फाटा ते देहू आळंदी पर्यंतच्या रस्त्यावरील बस थाब्यांची आवश्यकते नुसार सुधारणा विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या सुमारे २ कोटी ८३लाख ५९ हजार रूपयांच्यां खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.