Pimpri Chikhali Crime | पिंपरी : सावकारांच्या तगाद्याला कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या; 7 सावकारांवर गुन्हा दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chikhali Crime | कर्ज व त्याचे व्याज वसुलीसाठी सावकारांकडून (Money Lenders) होत असलेल्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून एका 50 वर्षाच्या व्यक्तीने किडे मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या केली (Suicide Case). ही घटना 12 मार्च 2024 रोजी शाहूनगर , चिंचवड येथे घडली. याप्रकरणी चिखली पोलिसांनी (Chikhali Police Station) सात सावकारांवर गुन्हा दाखल केला आहे.(Pimpri Chikhali Crime)

राजेंद्र किसन कदम (वय 50) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्या पत्नीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून राजू शंकर राणे (रा. निगडी प्राधिकरण), संजय शेलार (रा. चिंचवड स्टेशन), शाम तेलगू, रमेश औताडे, शाम हुज्जी, संतोष गाकवाड, चऱ्हाटे अशा सात जणांवर आयपीसी 306, 420, 406, 504, 506, 34 सह महाराष्ट्र सावकारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कर्ज काढून देण्याच्या बहाण्याने फिर्यादीचा फ्लॅट नावावर करून घेत
फसवणूक केली. यानंतर व्याजाच्या पैशासाठी सतत तगादा लावून शिवीगाळ, दमदाटी करुन शारीरिक व मानसिक छळ केला.
आरोपींनी 2014 ते 12 मार्च 2024 यालावधीत फिर्यादी यांच्या पतीचा छळ केला.
त्यांच्या या छळाला कंटाळून कदम यांनी खटनिल नावाचे किडे मारण्याचे विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.
यावरून चिखली पोलिसांनी आरोपींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pradeep Sharma | लखन भैया बनावट एन्काऊंटर प्रकरणी प्रदीप शर्मांना जन्मठेपेची शिक्षा

Pimpri Dighi Crime | पिंपरी : दागिने चोरणाऱ्या महिलेला अटक, पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Kothrud Crime | ज्यूस विक्रेत्याला मारहाण, एकाला अटक, कोथरुड परिसरातील घटना