Pune Kothrud Crime | ज्यूस विक्रेत्याला मारहाण, एकाला अटक, कोथरुड परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kothrud Crime | ज्यूस का बनवतो अशी विचारणा करुन दोन सख्ख्या भावांनी ज्यूस सेंटर चालकाला बेदम मारहाण (Bedum Marhan) केली. तसेच दगड मारुन जखमी केले. हा प्रकार रविवारी (दि.17) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कोथरुड येथील डहाणुकर कॉलनी (Dahanukar Colony) येथील हॉटेल खान्डसरी (Hotel Khandsari) येथे घडला आहे. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी (Alankar Police Station) दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे.

याबाबत रविंद्र विश्वनाथ पाटेकर (वय-30 रा. सागर कॉलनी, कोथरुड) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन विनोद चव्हाण व सागर चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करुन विनोद याला अटक केली आहे. फिर्यादी हॉटेलमध्ये ज्यूस बनवत असताना आरोपी तिथे आले. ज्यूस का बनवतो अशी विचारणा करुन आरोपी विनोदने शिवीगाळ केली. त्यानंतर त्याचा भाऊ सागर याला बोलावून घेतले. त्यांनी फिर्यादी यांना हाताने मारहाण केली. सागर याने दगड फेकून मारल्याने फिर्यादी यांचे बोट दुखावले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.(Pune Kothrud Crime)

एकमेकांकडे पाहण्यावरुन शस्त्राने वार

पुणे : पत्नीकडे पाहात असल्याच्या कारणावरून एका युवकावर धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले
(Attempt To Murder). हा प्रकार गणेशखिंड (Ganeshkhind) येथील गणपती मंदिराजवळ रविवारी (दि.17) रात्री
साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत विजय अशोक गायकवाड (वय-31 रा. गणेशखिंड) यांनी
चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन राहुल रघुनाथ शिंदे,
रघुनाथ शिंदे व एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी आणि आरोपी एकमेकांचे नातेवाईक आहेत. महिलेने फिर्यादी यांना तू माझ्याकडे का बघतो अशी विचारणा
करुन शिवीगाळ केली. तर तिच्या पतीने लोखंडी धारदार हत्याराने वार करुन जखमी केले. फिर्यादी यांचा मेहुणा भांडण सोडवण्यासाठी आला असता आरोपींनी त्याला देखील हाताने मारहाण केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PMRDA News | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याचे आवाहन

Pune News | आगामी काळात रा.स्व. संघ ‘पंच परिवर्तन’ सूत्रावर आधारित काम करणार – प्रांत संघचालक प्रा. सुरेश जाधव

Chakan Firing Case | पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगारावर गोळीबार, चाकण परिसरातील घटना