Pimpri Chinchwad Accident News | पिंपरी : तीन वेगवेगळ्या अपघातात तीन दुचाकीस्वारांचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Accident News | पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मंगळवारी (दि.2) भोसरी, चिंचवड आणि चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघातात तीन दुचाकीस्वारांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे. याप्रकरणी संबंधित वाहन चालकांवर गुन्हा दाखल करुन एका डंपर चालकाला अटक केली आहे. (Pimpri Chinchwad Accident News)

भोसरी येथील स्वीटहोम चौकात (Sweet Home Chowk Bhosari) मंगळवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दुचाकी आणि डंपर यांच्यात अपघात झाला. यामध्ये मयुर रघुनाथ भावसार (वय-41 रा. पिंपळे सौदागर) यांचा मृत्यू झाला. याबाबत मयुर यांचे भाऊ आकाश रघुनाथ भावसार (वय-42 रा. वाकड) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी डंपर चालक सोनाजी बबन मोहिते (वय-27 रा. बाबडी रोड, लोणीकंद) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आरोपीने त्याच्या ताब्यातील डंपर भरधाव वेगात चालवून फिर्यादी यांच्या भावाच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात डंपरचे चाक मयुर भावसार यांच्या अंगावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

दुसरा अपघात चिखली (Chikhali) येथे मंगळवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास स्वाईन रोडवर झाला. याबाबत निखील दिलीप घोटकुले (वय-33 रा. ताथवडे गावठाण) यांनी चिखली पोलीस ठाण्यात (Chikhali Police Station) फिर्य़ाद दिली आहे. निखील यांचे वडिल दिलीप लक्ष्मण घोटकुले (वय-85) हे त्यांच्या दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी डंपर चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक हयगयीने व निष्काळजीपणाने बेदरकारपणे भरधाव वेगात चालवून फिर्यादी यांच्या वडिलांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. गंभीर जखमी झाल्याने फिर्यादी यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. याप्रकरणी डंपर क्रमांक एमएच 14 जीयु 4617 वरील चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

चिंचवड येथील चिंतामणी चौकात (Chintamani Chowk Chinchwad) कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात शालीवहान सखाराम कल्याणी (वय-65 रा. चिंचवडे नगर, चिंचवड) यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी (दि.-2) दुपारी दीडच्या सुमारास चिंतामणी चौकातील ममता स्वीट होम समोर झाला.
याबाबत एका महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) फिर्याद दिली आहे.
यावरुन सियाज कार क्र. एमएच 14 एफजी 8118 चा चालक रोहिदास मारुती पवार (रा. थेरगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्य़ादी यांचे वडील त्यांच्या दुचाकीवरुन बिजलीनगर चौकातून चिंतामणी चौकाकडे जात होते.
त्यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील कार भरधाव वेगात चालवून शालीवाहन कल्याणी यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली.
गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर आरोपी कार चालक रोहिदास पवार हा घटनास्थळी न थांबता पळून गेला आहे.
पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश झिंजुर्डे (PSI Ganesh Zinjurde) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Wagholi Crime | वाघोली येथील बिवरी गावात दरोडा, चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी लुटला 16 लाखांचा ऐवज

Pune Water Crisis-Traffic Issue | आम्हाला प्यायला पाणी आणि कोंडीमुक्त रस्ते कसे देणार? लोकसंख्येच्या विस्फोटामुळे पुण्याच्या पाण्याचा आणि वाहतुकीचा प्रश्न अतिगंभीरतेच्या दिशेने

Pimpri Murder Case | पिंपरी : मित्राचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला मध्य प्रदेशातून अटक