Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 716 नवीन रुग्ण, 1099 रुग्णांना डिस्चार्ज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक जिल्ह्यात संक्रमित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारने 1 जून पर्यंत लॉकडाऊन जाहिर केला आहे. त्यामुळे संक्रमित रुग्ण वाढण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ झाली होती. परंतु आता रुग्णांचा वाढता आलेख खाली येताना दिसून येत आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 716 नवीन रुग्ण आढळून आहेत. तर 46 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 716 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 44 हजार 663 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 1099 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 27 हजार 498 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 13 हजार 361 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 46 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 29 रुग्ण शहरातील आहेत. तर 17 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 3804 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, बुधवारी (दि.19) लसीचा पुरवठा झाला नसल्याने आज (गुरुवार) लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. आज कोव्हिशिल्ड लसीचा पुरवठा झाला असल्याने उद्या शहरातील 8 केंद्रावर लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.