Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन रुग्ण, 713 जणांना डिस्चार्ज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. आज शहरात नविन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आढळून आहे. तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांवर आली आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना बरे (Recover) होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad City) 158 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 06 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये 04 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pune Corona : दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 187 नवीन रुग्ण, 319 रुग्णांना डिस्चार्ज

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Health Department) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 158 नवीन रुग्ण (New patient) आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 54 हजार 090 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 713 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 48 हजार 315 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus) मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 1 हजार 549 ॲक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार (Treatment) सुरु आहेत.

FPO मधून 4300 कोटी रुपये जमवणार रामदेव यांची कंपनी, जाणून घ्या पूर्ण डिटेल

शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे.
आज दिवसभरात 06 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 03 रुग्ण शहरातील आहेत.
तर 03 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4226 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी (दि.14) शहरामध्ये 59 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या Pimpri Chinchwad Municipal Corporation वतीने लसीकरण Vaccination करण्यात आले आहे.
आज दिवसभरात 2181 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 5 लाख 28 हजार 744 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Title : pimpri chinchwad coronavirus news updates

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ST महामंडळ आता सुरु करणार पार्सल अन् कुरीअर सेवा, उत्पन्न वाढीसाठी घेतला निर्णय; वार्षिक 500 कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट

आता ‘पाकिस्तान क्रिकेट लीग’वरही ‘सट्टा’; सट्टेबाजी करणार्‍या 4 जणांना पोलिसांनी केली अटक