Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 120 नवीन रुग्ण, 39 जणांना डिस्चार्ज

ADV

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात गेल्या 24 तासात 120 नवीन कोरोना (CoronaVirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 39 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (शनिवार) शहरामध्ये एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकिय विभागने दिली आहे.

गेल्या 24 तासात शहरामध्ये 120 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 1 हजार 618 वर पोहचली आहे. आज 39 रुग्णांची दुसऱ्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 97 हजार 940 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात रुग्णांची संख्या घटत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे.

ADV

गेल्या 24 तासामध्ये पालिका हद्दीतील एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेला रुग्ण पुनावळे येथील रहिवासी आहेत. आतापर्यंत शहरात 2596 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 1827 शहरातील तर 769 पालिका हद्दीबाहेरील आहेत. सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 677 रुग्ण अॅक्टिव्ह (Active) असून त्यांच्यावर शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पिंपरी महापालीका हद्दीबाहेरील 107 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पिंपरी चिंचवडमधील 108 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.