Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 227 नवे पॉझिटिव्ह, 34 जणांना डिस्चार्ज

ADV

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. औद्योगिक नगरीत कोरोना नियंत्रणात आला असताना पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मागील दोन-तीन दिवसांत रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात गेल्या 24 तासात 227 नवीन कोरोना (CoronaVirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 34 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (बुधवार) शहरामध्ये एकाही कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकिय विभागाने दिली आहे.

गेल्या 24 तासात शहरामध्ये 227 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 2 हजार 237 वर पोहचली आहे. आज 34 रुग्णांची दुसऱ्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 98 हजार 097 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात रुग्णांची संख्या घटत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण घटले असले तरी कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

ADV

गेल्या 24 तासामध्ये पालिका हद्दीत एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नागी. आतापर्यंत शहरात 2598 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 1827 शहरातील तर 771 पालिका हद्दीबाहेरील आहेत. सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 781 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह (Active) असून त्यांच्यावर शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पिंपरी महापालीका हद्दीबाहेरील 120 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पिंपरी चिंचवडमधील 121 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.