Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून रॉड व दगडाने मारहाण, दोघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Crime News | एकाच कंपनीत काम करणाऱ्या दोन कामगारांमध्ये सुरु असलेली भांडणे सोडवणे एकाला चांगलेच महागात पडले आहे. भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून एका व्यक्तीच्या डोक्यात रॉड मारुन जखमी केले (Attempt To Kill). तर इतर साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार बुधवारी (दि.13) सायंकाळी सहाच्या सुमारास एमआयडीसी भोसरी येथील एजिओ फार्मा लि. या कंपनीच्या गेट समोर घडला.(Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत सुरेश प्रभाकर जैन (वय-49 रा. अप्पुघर पाठीमागे, निगडी, पुणे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari MIDC Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन संकेत दिलीप बनसोडे (वय-23) व गणेश अंबादास वाघचौरे (वय-18 दोघे रा. रा. बालाजीनगर, भोसरी) यांच्यासह इतर तीन जणांवर आयपीसी 307, 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करुन संकेत व गणेश यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकाच कंपनीत काम करतात. आरोपी संकते याचे कंपनीत काम करणाऱ्या मनीभुषण याच्यासोबत वाद झाले होते. त्यावेळी फिर्यादी यांनी मध्यस्थी करुन संकेत याला समजावून सांगितले होते. याचा राग संकेत याच्या मनात होता. बुधवारी सांयकाळी सहाच्या सुमारास फिर्य़ादी कंपनीच्या गेटसमोर मोबाईलवर बोलत उभे होते. त्यावेळी संकेत याने फिर्यादी यांना भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून शिवीगाळ करुन, तुला आता जिवंत सोड नाही, तुला आता संपवुनच टाकतो अशी धमकी दिली.

तसेच आरोपी संकेत याने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने जीवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांच्या डोक्यात मारुन
गंभीर जखमी केले. त्याच्यासोबत असलेल्या तीन साथीदारांना त्याने बोलावून घेतले.
त्याने याला पकडा, त्याला सोडू नका असे म्हणून तिघांनी फिर्यादी यांच्या पोटात व छातीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तर एकाने त्याठिकाणी पडलेला दगड उचलून फिर्यादी यांच्या छातीवर मारुन गंभीर जखमी केले.
फिर्यादी यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इंगळे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांना जरांगेंचे खुले आव्हान, ”तर तुमच्या ४८ पैकी एकही खासदार…”

Electoral Bonds Doners List | निवडणूक रोख्यांची माहिती उघड, देशभरात वादळ! भाजपाने देणगी रूपात घेतले तब्बल ६,०६० कोटी, काँग्रेसला…

Asim Sarode On Eknath Shinde | शिंदेंकडे गेलेले 12 आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे जाणार; असीम सरोदे यांचा चंद्रपूर मध्ये दावा