Electoral Bonds Doners List | निवडणूक रोख्यांची माहिती उघड, देशभरात वादळ! भाजपाने देणगी रूपात घेतले तब्बल ६,०६० कोटी, काँग्रेसला…

नवी दिल्ली : Electoral Bonds Doners List | राजकीय पक्षांना मिळणारा बेनामी पैसा नेमका कुठून येत आहे? याची सर्व माहिती मतदारांना त्यांचा मूलभूत हक्क म्हणून मिळायला हवी, या मुख्य उद्देशाने सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ही माहित उघड करण्यासंबंधी ऐतिहासिक निकाल दिला होता. त्यानुसार निवडणूक आयोगाने एसबीआयकडून निवडणूक रोखे खरेदी करणाऱ्या कंपन्या आणि राजकीय पक्षांना किती निवडणूक रोखे मिळाले यांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. (EC Shares Electoral Bonds Data)

ही आकडेवारी पाहून संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का बसला असून वादळ उठले आहे. मिळालेल्या एकुण निवडणूक रोख्यांपैकी सर्वाधिक ६०६० कोटी रूपयांचे रोखे भाजपाने वटवले आहेत.(Electoral Bonds Doners List)

कोणत्या पक्षाला किती रकमेचे निवडणूक रोखे मिळाले, कोणत्या पक्षाने किती कोटींचे निवडणूक रोखे वटवले आणि कोणत्या खरेदीदाराने म्हणजेच कंपनीने किती कोटींचे रोखे खरेदी केले, याची माहिती निवडणूक आयोगाने संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या या यादीमध्ये देशभरातील अनेक नामांकित कंपन्या, व्यावसायिक किंवा वैयक्तिक खरेदीदारांचा समावेश आहे. वैयक्तिक देणग्यांचा तपशील अद्याप जाहीर केलेला नाही. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाने, कोणत्या देणगीदाराने कोणत्या पक्षासाठी रोखे खरेदी केले याची माहिती दिलेली नाही.

२०१९ आणि २०२४ या दरम्यान सर्वाधिक निवडणूक रोखे खरेदी करणाऱ्या पाच कंपन्यांपैकी तीन कंपन्यावर ईडी आणि प्राप्तीकर विभागाने कारवाई केली होती, अशी माहिती आहे. ज्यामध्ये लॉटरी कंपनी असेलली फ्युचर गेमिंग, बांधकाम क्षेत्रात काम करणारी मेघा इंजिनिअरिंग आणि खाण व्यवसायातील बलाढ्य कंपनी वेदांता यांचा समावेश आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार –

  • १२ एप्रिल २०१९ ते १५ फेब्रुवारी २०२४ या ५ वर्षांच्या काळात एकूण २२ हजार २१७ कोटी रुपये किमतीच्या रोख्यांची एसबीआयने विक्री केली. त्यामध्ये अनेक नामांकित कंपन्या, व्यावसायिक व वैयक्तिक खरेदीदारांचा समावेश आहे.
  • सर्वाधिक ८ हजार ६३३ कोटींचे रोखे भाजपाच्या नावे काढण्यात आले आहेत. भाजपाने सर्वाधिक ६ हजार ०६० कोटींचे रोखे वटवले आहेत. अलिकडे जानेवारी २०२४ मध्ये भाजपाने सुमारे २०० कोटींचे रोखे वटवले आहेत.

टॉप २० देणगीदार आणि त्यांनी दिलेली रक्कम

१. १३६८ कोटी – फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सव्र्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड
२. ९६६ कोटी – मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्टक्चर लिमिटेड.
३. ४१० कोटी – क्विक सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेड.
४. ३७७ कोटी – हल्दिया एनर्जी लिमिटेड.
५. ३७६ कोटी – वेदांता लिमिटेड.
६. २२५ कोटी – एस्सेल मायनिंग अँड इंडस्टड्ढीज लिमिटेड.
७. २२० कोटी – वेस्टर्न यूपी पॉवर टड्ढान्समिशन कंपनी.
८. १९८ कोटी – भारती एअरटेल.
९. १९५ कोटी – केवेंतर फूड पार्क इन्फ्रा लिमिटेड.
१०. १९२ कोटी – एमकेजे एंटरप्रायजेस लिमिटेड.
११. १८६ कोटी – मदनलाल लिमिटेड.
१२. १६२ कोटी – यशोदा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
१३. १४६ कोटी – उत्कल अ‍ॅल्युमिनियम इंटरनॅशनल लिमिटेड
१४. १३० कोटी – डीएफएल कमर्शियल डेव्हलपर्स लिमिटेड
१५. १२३ कोटी – जिंदाल स्टील अँड पॉवर्स लिमिटेड
१६. ११९ कोटी – बी. जी. शिर्के कन्स्टड्ढक्शन टेक्नोलॉजी प्रा. लि.
१७. ११५ कोटी – धारिवाल इन्फ्रास्टड्ढक्चर लिमिटेड
१८. ११३ कोटी – अवीस टड्ढेडिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड
१९. १०७ कोटी – टोरंट पॉवर लिमिटेड
२०. १०५ कोटी – बिर्ला कार्बन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड.
या २० कंपन्यांनी राजकीय पक्षांना तब्बल ५८३२ कोटी रुपये दिले आहेत.

भाजपानंतर या पक्षाला सर्वाधिक देणगी
एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२४ दरम्यान भाजपानंतर देशात सर्वाधिक देणगी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मिळाल्याचे स्पष्ट झालं आहे. तृणमूल काँग्रेसने एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२४ दरम्यान एकूण १६०९ कोटी रुपयांचे रोखे वठवले आहेत.

काँग्रेसने १४२१ कोटींचे रोखे वटवले
काँग्रेसने मिळालेल्या ३१४६ हजार कोटींच्या रोख्यांपैकी ५० टक्क्यांहून कमी म्हणजेच १४२१.८७ हजार कोटींचे रोखे वटवले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Sahakar Nagar Crime | महागड्या सायकल चोरणाऱ्या आरोपीला सहकारनगर पोलिसांकडून अटक, 6 सायकल जप्त

Punit Balan Group (PBG) | इंद्राणी बालन फाऊंडेशन, पुनित बालन ग्रूपचे कार्य वाखाणण्याजोगे : सुहास पाटील

Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगत दोघांची एक कोटींची फसवणूक