Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : टेम्पोला मिक्सरची पाठीमागून धडक, चालकाचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Crime News | भरधाव वेगात जाणाऱ्या मिक्सरने समोरील टेम्पोला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये मिक्सर चालकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि.13) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास जुना बेंगलोर-मुंबई हायवे (Bangalore Mumbai Highway) वरील तळेगावकडे जाणाऱ्या लेनवर मामुर्डी गावाजवळ झाला. सुरेश प्रकाश चर्मकार (वय-38 रा. मु.पो पहाडी ता शिवार सिद्धी मध्यप्रदेश) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे.

याबाबत अखिलेश कुमार साकेत (वय-25 रा. आंबी ता. मावळ) याने देहुरोड पोलीस ठाण्यात (Dehu Raod Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन मयत सुरेश चर्मकार याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी याने त्याच्या ताब्यातील मिक्सर गाडी भरधाव वेगाने चालवून पुढे जाणाऱ्या टेम्पोला धडक दिली. यात मिक्सर चालक सुरेश चर्मकार याचा मृत्यू झाला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.(Pimpri Chinchwad Crime News)

दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

वाकड : भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीची धडक एका 17 वर्षीय तरुणाला बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन
तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि.13) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वाकड येथील
(Phoenix Mall Pune) फिनिक्स मॉल समोरील रोडवर झाला. याप्रकरणी कैलास त्र्यंबक श्रावणे (वय-28 रा. औंध, पुणे)
याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मृत तरुणाचे वडिल परमेश्वर मारुती रणदिवे
(वय-45 रा. थेरगाव, चिंचवड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्य़ाद दिली आहे.

फिर्यादी यांचा मुलगा फिनिक्स मॉलच्या समोरील रोडवरून जात होता. त्यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने, हयगयीने व निष्काळजीपणे चालवून फिर्यादी यांच्या मुलाला धडक दिली. त्यामुळे फिर्यादी यांच्या मुलाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी पळून गेला आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : शुल्लक कारणावरुन पतीकडून पत्नीला बॅटने मारहाण, मुलीची पोलिसांत तक्रार

Supriya Sule On Ajit Pawar | निवडणूक रोखे प्रकरणांवर श्वेतपत्रिका काढा, सुप्रिया सुळेंची मागणी, अजित पवारांच्या टीकेलाही दिले उत्तर

Lok Sabha Election 2024 | उद्या वाजणार लोकसभा निवडणुकीचे बिगुल! आचारसंहिता लागू होणार, निवडणुक कार्यक्रम होईल स्पष्ट