Lok Sabha Election 2024 | उद्या वाजणार लोकसभा निवडणुकीचे बिगुल! आचारसंहिता लागू होणार, निवडणुक कार्यक्रम होईल स्पष्ट

नवी दिल्ली : Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणूक खरी रणधुमाळी उद्यापासून सुरू होणार आहे. कारण, उद्या शनिवारी दुपारी ३ वाजता निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेकडे देशाचे लक्ष असणार आहे. यासंबंधी वृत्त एएनआयने दिले आहे.(Lok Sabha Election 2024)

या वृत्तानुसार, उद्या दुपारी ३ वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम आणि काही विधानसभा निवडणुकांची घोषणा करणार आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीत सुमारे ९७ कोटी लोक मतदान करणार आहेत.

निवडणुक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर राजकीय पक्षांची रणधुमाळी सुरू होईल.
लोकसभा निवडणूक किती टप्प्यात जाहीर करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
लोकसभा निवडणुका ६ ते ७ टप्प्यात होतील असा अंदाज आहे.

उद्या आयोगाने निवडणुक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिताही लागू होईल.
२०१९ ची सार्वत्रिक निवडणुक १० मार्च रोजी जाहीर झाली होती. त्यावेळी ११ एप्रिल ते १९ मे दरम्यान
टप्प्याटप्प्यात निवडणुका झाल्या होत्या. तसेच मतदान ६७.१ टक्के झाले होते. तर २३ मे रोजी मतमोजणी झाली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : शुल्लक कारणावरुन पतीकडून पत्नीला बॅटने मारहाण, मुलीची पोलिसांत तक्रार

Pune Mahavitaran News | शनिवारी, रविवारी पश्चिम महाराष्ट्रातील महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू

पुण्यात असलेले देशातील एकमेव आसनस्थ बालाजी मंदिर भक्तांचे श्रध्दास्थान; पद्मासन मुद्रेत दगडी सिंहासनावर बालाजी विराजमान