Supriya Sule On Ajit Pawar | निवडणूक रोखे प्रकरणांवर श्वेतपत्रिका काढा, सुप्रिया सुळेंची मागणी, अजित पवारांच्या टीकेलाही दिले उत्तर

बारामती : Supriya Sule On Ajit Pawar | लॉटरी, जुगार चालविणाऱ्या कंपन्यांकडून भाजपाला (BJP) मोठ्या प्रमाणात देणगी मिळालेली आहे. या कंपन्यांनी देणगी का दिली? याची चौकशी झाली पाहीजे. एकूणच निवडणूक रोखे प्रकरणांवर श्वेतपत्रिका काढली जावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी आज बारामती (Baramati) येथील पत्रकार परिषदेत केली. यानंतर खासदार सुळे यांनी अजित पवारांनी केलेल्या टीकेला देखील उत्तर दिले.

अजित पवार यांनी होते म्हटले की, लोकसभेत जाऊन मोदी-शाह यांच्याविरोधात बोलण्यापेक्षा मतदारसंघात निधी आणा.
या टीकेला प्रत्युत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी सभागृहात कधीही मोदी-शाह यांच्यावर वैयक्तिक टीका केली नाही.
आमचा लढा धोरणांच्या विरोधात आहे. भाजपाने कांदा निर्यातबंदी केली, दूध-सोयाबिनला भाव मिळाला नाही,
बेरोजगारी वाढलीय, याबद्दल मी प्रश्न विचारले. ही वैयक्तिक टीका नाही.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवारांचा संसदेतील भाषणावर असणारा आक्षेप चिंताजनक आणि आश्चर्यजनक आहे.
३० वर्ष लोकशाहीत काम केलेल्या व्यक्तीला संसदेवर विश्वास नाही, हे ऐकून धक्का बसला. पंतप्रधान मोदींनी याच संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक होऊन कामाची सुरुवात केली होती.

मोक्काच्या आरोपातून एका कार्यकत्र्याला वाचवल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी बारामती येथील प्रचारसभेत केले होते.
याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे गंभीर प्रकरण असून कुणाला मोक्का लागला होता? त्यांना का वाचवले? याचा
सोक्षमोक्ष लावावा. महाराष्ट्र सरकारने यावर भूमिका जाहीर करावी, असे आवाहन सुळे यांनी केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : शुल्लक कारणावरुन पतीकडून पत्नीला बॅटने मारहाण, मुलीची पोलिसांत तक्रार