Pimpri Chinchwad Murder Case | पिंपरी : आर्थिक व्यवहारातून लिफ्टच्या डक्टमध्ये ढकलून मजुराचा खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Murder Case | हात उसने घेतलेल्या पैशांवरुन वाद घालून 40 फुट खोल लिफ्टच्या डक्टमध्ये ढकलुन देऊन मजुराचा खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि.21) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मोशी येथील श्री साई फॉर्च्युन रॉयल ग्रुप (Shree Saai Fortune Moshi) बांधकाम साईटवरील लेबर कॅम्पमध्ये घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी (Bhosari MIDC Police) पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

सत्यनारायण कर्ष असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी सुरेंद्रकुमार व्यासनारायण कर्ष (वय-32 रा. लेबर कॅम्प, शिवाजी वाडी, मोशी) याच्यावर आयपीसी 302, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याप्रकरणी मृत व्यक्तीचा चुलत भाऊ गजानंद किरिसिंग कर्ष (वय-39 रा. लेबर कॅम्प, मोशी) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Pimpri Chinchwad Murder Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ सत्यनारायण याने आरोपी सुरेद्रकुमार याच्याकडून एक हजार रुपये उसने घेतले होते. मात्र त्याने पैसे परत केले नव्हते. रविवारी दुपारी फिर्यादी यांचा भाऊ सत्यनारायण कर्ष, रुपेश साहू, गोलू साहू, प्रदिपकुमार कर्ष, अक्षयकुमार साहु हे मोशी येथील श्री साई फॉर्च्यूंन सोसायटी येथे पहिल्या मजल्यावर लिफ्टच्या डक्ट जवळ प्लास्टरचे काम करत होते.

त्यावेळी आरोपी हा सत्यनारायण काम करत असलेल्या ठिकाणी आला.
त्याने हात उसने दिलेल्या पैशांची मागणी करुन सत्यनारायण याच्यासोबत वाद घातला.
रागाने त्यांची कॉलर पकडून शिवीगाळ करत आताच पैसे दे नाहीतर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.
त्याने सत्यनारायण याला जोरात धक्का दिला. यामुळे तो लिफ्टच्या 40 फुट खोल डक्टमध्ये पडला.
यात गंभीर जखमी झाल्याने सत्यनारायण याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी आरोपी सुरेंद्रकुमार याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पुढील तपास एमआयडीसी भोसरी करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Court News | सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Anant Geete On Pawar Family | शरद पवारांचं घर कोणी फोडलं? शिवसेना नेते अनंत गीतेंनी केला गौप्यस्फोट, ‘या’ बड्या नेत्याचं नाव घेतल्याने खळबळ!

Mahavir Jayanti | महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त बिबेवाडी गंगाधाम येथे भव्य शोभायात्रा; मिरवणुकीत आमदार माधुरी मिसाळ आणि लोकसभा उमेदवार मुरलीधर मोहोळ सहभागी