Supriya Sule On Mahayuti Govt Maharashtra | आमची लढाई ही दडपशाही विरोधात, सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Supriya Sule On Mahayuti Govt Maharashtra | कांद्याला हमीभाव द्या, ही मागणी केल्याने मला आणि खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना संसदेतून एक दिवसासाठी निलंबित केले होते. ही सरकारची दडपशाही आहे. यंदाच्या निवडणूकीत आम्ही दडपशाहीच्या विरोधात लढणार आहोत, असं बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, कांद्याचा प्रश्न उपस्थित केल्याने मला आणि आमोल कोल्हेंना एक दिवसासाठी निलंबित केले होते. आम्ही कोणत्याही प्रकराचं वाईट कृत्य केलं नव्हतं तर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले होते. तसेच कांद्याला हमीभाव द्या, एवढी साधी मागणी सरकारकडे केली असताना त्यांनी आम्हाला निलंबित केले होते. त्यामुळे हे सरकार कायम दडपशाही करत आलं आहे. ही दडपशाही आता चालणार नाही. आमची लढाई ही या दडपशाही विरोधात असल्याचे त्यांनी सांगितले.

असूड उगारण्याची वेळ आली – अमोल कोल्हे

यावेळी अमोल कोल्हे म्हणाले, आजचा शेतकरी हा केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पिचलेला आहे.
महात्मा फुले यांनी 1883 मध्ये शेतकऱ्यांच्या अवस्थेचे एवढे प्रभावी व वास्तवदर्शी चित्रण महात्मा फुलेंनी केले आहे
त्याला तोड नाही. वर्तमानात यात किंचितही बदल झालेला नाही.
त्यामुळे या चुकीच्या शेती विषयक धोरणांच्या विरोधात हाच असूड उगारण्याची वेळ आली आहे, असं कोल्हे म्हणाले.

महात्मा फुलेंनी 1883 मध्ये ‘शेतकऱ्याचा असू़ड’ हा ग्रंथ लिहिला.
त्यामध्ये शेतकऱ्याच्या विदारक परिस्थितीचे चित्रण करुन विकासाचा मार्ग सांगितला आहे, असं कोल्हे यांनी सांगितले.
सध्या कांदा उत्पादक शेतकरी असो की सोयाबीन, दूध उत्पादक शेतकरी असो केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अल्पभूधारक शेतकरी हा नागवला जात आहे. त्याविरोधात आवाज उठवणं, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं हेच फुलेंना आमचं अभिवादन असेल असेही अमोल कोल्हे यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On Vijay Shivtare | ‘तुम्ही मला मूर्ख समजू नका’, विजय शिवतारेंबाबत अजित पवारांनी मांडली भूमिका (Video)