corona vaccine : पिंपरी चिंचवड शहरात 8 केंद्रावर 456 जणांना लसीकरण

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसवर अखेर लस उपलब्ध झाली असून आजपासून (शनिवार) कोरोना लसीकरणास सुरुवात झाली आहे. देशभरात आजपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ झाला. तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये 8 केंद्रावर लसीकरण मोहीम राबवण्यात आली. महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना लस टोचून लसीकरणाचा शुभारंभ महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

या कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, उपमहापौर केशव घोळवे, पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, नगरसेवक संदिप वाघेरे, शैलेश मोरे, प्रेमकुमार उर्फ बाबू नायर, नगरसेविका उषा वाघेरे, निर्मला कुटे, सविता खुळे, निकिता कदम, अर्चना बारणे, ग प्रभाग अध्यक्ष बाळासाहेब त्रिभुवन, सहाय्यक आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, ज्येष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ. संगिता तिरुमणी, डॉ. बाळासाहेब होडगर यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये महानगरपालिकेच्या यमुनानगर रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, वाय.सी.एम रुग्णालय, पिंपळे निलख दवाखाना, कासारवाडी दवाखाना, तालेरा रुग्णालय व ईएसआयएस या 8 रुग्णालयांमध्ये कोविड-19 लसीकरणाला आजपासून सुरुवात झाली. ही लस आरोग्य सेवा देणाऱ्या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्राधान्याने देण्यात येणार आहे.

आज दिवसभरात एका केंद्रावर 100 जणांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच चार आठवड्यानंतर या लसीच्या दुसरा डोस दिला जाणार आहे. कोविन अॅपद्वारे लाभार्थ्यीच्या नोंदणीकृत मोबाइलवर एसएमएस द्वारे मेसेज पाठवला जाणार असून या मसेजमद्ये लसीकरण दिनांक, वेळ व स्थान यांचा उल्लेख असणार आहे. आज दिवसभरात सायंकाळी पाच वाजेपर्यंत पिंपरी चिंचवड महापनगरपालिकेच्या 8 केंद्रावर 456 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.

लसीकरण केंद्राचे नाव आणि पुढे संख्या
1. यमुनानगर रुग्णालय – 60
2. नवीन जिजामाता रुग्णालय – 71
3. नवीन भोसरी रुग्णालय – 66
4. वाय.सी.एम रुग्णालय – 49
5. पिंपळे निलख दवाखाना – 49
6. कासारवाडी दवाखाना – 65
7. तालेरा रुग्णालय – 50
8. ईएसआयएस – 46