Pimpri Chinchwad Police Commissionerate | पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात आता 3 झोन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Police Commissionerate | पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या (Population) आणि वाढती गुन्हेगारीच्या (Crime In Pimpri Chinchwad) पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यात आले. सध्या पोलीस आयुक्तालयामध्ये (Pimpri Chinchwad Police Commissionerate) दोन झोन Zone (परिमंडळ) असून पोलीस उपायुक्त दर्जाच्या (DCP) अधिकाऱ्याच्या देखरेखेखाली या झोनचे कामकाज चालते. मात्र, शहरात वाढत असलेली गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी आणखी एक झोन तयार करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (IPS Vinoy Kumar Choubey) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

पिंपरी-चिंचवडची वाढती लोकसंख्या, नागरीकरण, औद्योगिकीकरण, शिक्षण संस्था, वाहने यामध्ये वाढ होत असल्याने यंत्रणेवर ताण येत होता. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था (Law and Order) अधिक परिणामकारकपणे राखता यावी म्हणून पुणे शहर पोलीस आयुक्त (Pune City Police Commissioner) आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक (Pune Rural SP) यांच्या कार्यक्षेत्राचे विभाजन करून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची (Pimpri Chinchwad Police Commissionerate) निर्मिती करण्यात आली आहे. 15 ऑगस्ट 2018 रोजी स्वतंत्र पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली.

पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतर दोन झोन निर्माण करण्यात आले. सध्या पोलीस उपायुक्त विवेक पाटील (DCP Vivek Patil) आणि पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे (DCP Kakasaheb Dole) यांच्याकडे या झोनची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय स्वप्ना गोरे (DCP Swapna Gore) यांच्याकडे गुन्हे शाखेसह, मुख्यालय, प्रशासनाची जबाबदारी आहे. यातच संदीप डोईफोडे (Sandeep Doifode) आणि शिवाजी पवार (Shivaji Pawar) या दोन पोलीस उपायुक्तांची पिंपरी चिंचवड शहरामध्ये बदली झाली. परंतु त्यांच्याकडे अद्याप कोणताही पदभार देण्यात आलेला नाही. तिसरे झोन होणार असल्यामुळे त्यांच्याकडे अद्याप जबाबदारी दिली नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता येत्या 15 दिवसांमध्ये झोनच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. ही मंजुरी मिळताच नव्याने हजर झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांना पदभार दिला जाणार आहे.

सध्या दोन झोनमध्ये चार सहाय्यक पोलीस आयुक्त (Assistant Commissioner of Police (ACP)
कामकाज पाहत आहेत. तिसऱ्या झोनची निर्मिती झाल्यानंतर 6 सहाय्यक पोलीस आयुक्त असतील.
यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात असून 4 सहाय्यक पोलीस आयुक्त पदाच्या निर्मितीला मंजुरी मिळाली आहे.
परंतु याबाबतचा अध्यादेश अद्याप काढलेला नाही. शासनाकडून लवकरच अध्यादेश काढला जाईल, असे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Edible Oil Prices | सणासुदीच्या आधी गृहिणींसाठी आनंदाची बातमी: तेलाच्या किमतीबाबत आली अपडेट

Pune Crime News | खोटे कागदपत्र तयार करुन जागा बळकावली, 8 कोटींची फसवणूक करणाऱ्या दोघांवर FIR; पर्वती परिसरातील घटना