Pimpri Chinchwad Police MCOCA Action | पिंपरी : महाळुंगे परिसरातील राहुल पवार टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांची 9 वी कारवाई

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Police MCOCA Action | आगामी लोकसभा निवडणूका (Lok Sabha Election 2024) भयमुक्त आणि नि:पक्षपाती पार पडाव्यात यासाठी पिंपरी- चिंचवड पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील 9 सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांमधील 44 आरोपींवर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या (Mahalunge MIDC Police Station) हद्दीतील राहुल पवार टोळीवर मोक्का कारवाई केली आहे.

महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आयपीसी 302, 364, 201, 120(ब), 212, 34 गुन्ह्यातील आरोपी आणि टोळी प्रमुख राहुल संजय पवार (रा. महाळुंगे इंगळे ता. खेड), अमर नामदेव शिंदे (वय-28 रा. मु.पो. कासार आंबोली, ता मुळशी), नितीन पोपट तांबे (वय-34 रा. देहुगाव रोड, मोशी), अभिजीत उर्फ अभि चिंतामणी मराठे (रा. जयभवानी नगर, कोथरुड), आसिफ उर्फ आशू हैदर हाफशी (रा. कासारवाडी, पुणे) यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपींवर 7 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

टोळी प्रमुख आणि त्याच्या साथीदारांनी महाळुंगे एमआयडीसी, चाकण, एमआयडीसी भोसरी, सांगवी पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, खंडणीसाठी अपहरण, जबरी चोरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. प्रत्येक गुन्हा करताना टोळी प्रमुख राहुल पवार याने वैयक्तीक व टोळीचे वर्चस्व व आर्थिक फायद्यासाठी तसेच दहशत निर्माण करण्यासाठी गुन्हे केले आहेत.

महाळुंगे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.(Pimpri Chinchwad Police MCOCA Action)

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदिप डोईफोडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते, पीसीबी गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अनिल देवडे, पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी, कोणकेरी यांच्या पथकाने केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिजू इलेक्ट्रिशन होते. ते सायंकाळी कामावरुन घरी आले. त्यावेळी घरात कोणी नव्हते.
सिजू यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सिजू यांनी खोलीचा दरवाजा बंद केला होता. कुटुंबीयांनी दरवाजा वाजविला.
आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी याची माहिती चंदननगर पोलिसांना दिली.
पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. तेव्हा सिजू यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.

सासरकडील नातेवाईकांनी सिजू यांना त्रास दिल्याने ते मागील काही दिवसांपासून तणावात होते.
नैराश्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. सिजू यांनी आत्महत्या करण्यापूर्वी घरातील भिंतीवर आरोपींच्या सततच्या
त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे पेनाने लिहून ठेवले आहे.
आरोपींनी सिजू याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
यावरुन पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक माने करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Attack On Police Officer In Pune | पुण्यात पोलिसांवरील हल्ले सुरूच; भांडण सोडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली

Pune Estate Broker Arrested On Mumbai Airport | मुंबई विमानतळावर BMW कारमध्ये सापडले US बनावटीचे पिस्तूल अन् काडतुसे, पुण्यातील रिअल इस्टेट ब्रोकर तुषार काळे, सचिन पोटे, आकाश शिंदेला अटक

Shewalwadi Pune Firing Case | पुणे हादरलं, सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार; ‘सिक्युरिटी एजन्सी’च्या वादातून गोळीबार