Pimpri Chinchwad Police News | पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम, सर्वप्रथम हिंजवडीमध्ये कार्यान्वीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Police News | पिंपरी चिंचवड पोलिसांनी संपुर्ण शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, अडीअडचणी सोडविण्यासाठी ‘ज्येष्ठानुबंध’ (TO Solve Problems Of Senior Citizens) हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठानुबंध उपक्रमाची सुरूवात हिंजवडी पोलिस ठाण्याच्या (Hinjewadi Police Station) हद्दीतून करण्यात आली असून बावधन येथील सुर्यदत्ता कॉलेज (Suryadatta College Bavdhan) येथे पोलिस आयुक्त विजयकुमार चौबे (IPS Vinay Kumar Choubey) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक सहाय्यता मेळावा संपन्न झाला. यावेळी पोलिस आयुक्तांनी ज्येष्ठानुबंध हा उपक्रम पिंपरी-चिंचवड शहरात सर्वत्रच राबविला जाणार असल्याचे सांगितले. (Pimpri Chinchwad Police News)

प्रमुख पाहुण्याच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. सदाबहार सिनियर्स संघाच्या ज्येष्ठ नागरिकांनी स्वागतगीत सादर केले. ज्येष्ठ नागरिक कक्षाचे कामकाज पाहणारे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र होनराव (PSI Rajendra Honrao) यांनी ज्येष्ठ नागरिक कक्षाबाबतच्या कामकाज कायद्याविषयी पीपीटी व्दारे माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांनी सायबर फसवणुक (Cyber Crime) होण्यापासून कसे सावध रहावे याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक पानमंद (API Panmand) यांनी मार्गदर्शन केले. (Pimpri Chinchwad Police News)

सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. विशाल हिरे (ACP Dr. Vishal Hire) यांनी प्रस्ताविकात ज्येष्ठ नागरिकांपैकी ऐकटे/दुकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक यांची माहिती देवुन त्यांची देखभाल करण्याकरिता प्रत्येकी 1 अंमलदार यांची नेमणुक करून काही समस्या अथवा अडचण निर्माण झाल्यास त्यांनी तात्काळ संबंधित अंमलदार यांच्याशी संपर्क करण्याबाबत सूचना दिल्या. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेवून पोलिस आयुक्त विजयकुमार चौबे यांनी त्यांच्या शंकांचे समाधान केले.

ज्येष्ठ नागरिकांशी पोलिसांचा ऋुणानुबंध निर्माण करीत ज्येष्ठ नागरिकांशी कायम संपर्कात राहुन त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठीच्या उपक्रमास ज्येष्ठानुबंध असे नाव देवुन सदर नावाच्या फलकाचे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अनावरण करण्यात आले. पोलिस आयुक्तांनी ज्येष्ठ नागरिकांना येणार्‍या दैनंदिन समस्या व त्या निवारण्यासाठी पोलिसांचा सहभाग या बाबत मार्गदर्शन केले. त्यांनी ज्येष्ठानुबंध या उपक्रमाचे महत्व विशद केले. असाच उपक्रम पुर्ण आयुक्तालय हद्दीत लवकरच राबविणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे तथा अध्यक्ष म्हणून पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त संजय शिंदे (IPS Sanjay Shinde), वाकड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. विशाल हिरे, हिंजवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर (Senior PI Vivek Muglikar), ज्येष्ठ नागरिक कक्षाचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र होनराव, सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटयुटसचे संजय बी. चोरडीया (Prof. Dr. Sanjay B. Chordiya), सुषमा चोरडीया (Sushma Chordiya), माजी नगरसेवक किरण दगडे (Kiran Dagde), माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील (Dilip Vede Patil), सदाबहार सिनिअर्स संघाचे (बावधन) अध्यक्ष नीलकंठ बजाज (Neelkanth bajaj) यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये तब्बल 225 ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. ज्येष्ठ नागरिक सहाय्यता मेळावा कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आर.जे. अक्षय यांनी केले. डॉ. विवेक मुगळीकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Web Title : Pimpri Chinchwad Police News | Pimpri-Chinchwad Police launched ‘Jyeshtanubandh’ initiative for senior citizens, first implemented in Hinjewadi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Crime | पुणे जिल्ह्यात खळबळ ! सुप्रिया सुळेंचे निकटवर्तीय माजी नगरसेवकाची जमिनीच्या वादातून कोयता आणि कुऱ्हाडीने हत्या

Pune Police News | फरासखाना पोलिसांकडून मोक्कातील फरार आरोपीला अटक; पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांच्याकडून पोलिस अंमलदाराचा सत्कार

Speaker Rahul Narvekar | 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निर्णयाला लागला वेग; विधानसभा अध्यक्ष आजच नोटीस देण्याची शक्यता

NCP Chief Sharad Pawar | “राष्ट्रवादीत उभी फूट म्हणजे शरद पवारांनी ठरवून केलेला कार्यक्रम”; पवारांच्या जुन्या सहकाऱ्याचा दावा

Pune Crime News | पुणे : ट्रेकला गेलेला तरुण पाण्यात गेला वाहून; मावळमधील कुंडमळ्यातील धक्कादायक घटना

Dr. Pradeep Kurulkar | प्रदीप कुरुलकरांची पाकिस्तानी गुप्तहेराबरोबर क्षेपणास्त्रांविषयी चर्चा; एटीएसच्या दोषारोपपत्रात धक्कादायक उल्लेख

Pune Crime News | पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 26 वी MPDA ची कारवाई ! विमाननगर परिसरात दहशत माजविणारा गुंड स्थानबद्ध