Pimpri Chinchwad Power Outage | 400 केव्ही अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड; पिंपरी-चिंचवड, उर्से, शिक्रापूर भागात वीजपुरवठा खंडित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Power Outage | पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (पीजीसीआयएल) ४०० केव्ही शिक्रापूर ते तळेगाव अतिउच्चदाब वीजवाहिनी तुटल्याने शनिवारी (दि. ८) सकाळी ९ च्या सुमारास पिंपरी चिंचवड परिसर, शिक्रापूर, उर्से, थेऊर, पेरणे आदी परिसरातील ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. दरम्यान विजेची मागणी कमी असल्याने भार व्यवस्थापनाद्वारे पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्याचे प्रयत्न महावितरणकडून युद्धपातळीवर सुरु आहेत. तर काही भागात नाईलाजास्तव चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागत आहे. (Pimpri Chinchwad Power Outage)

याबाबत माहिती अशी की, पीजीसीआयएलच्या शिक्रापूर ते तळेगाव ४०० केव्हीच्या अतिउच्चदाब चारपैकी एक वीजवाहिनी तळेगाव एमआयडीसीजवळ आज सकाळी ९.०३ वाजता तुटली. त्यामुळे सुमारे ३५५ मेगावॅट विजेचे वहन ठप्प झाले. परिणामी पिंपरी गाव, रहाटणी, पिंपळे सौदागर, काळेवाडी, चिंचवड गाव, वाल्हेकरवाडी, रावेत, देहू रोड, खराडी, जुना मुंढवा, थिटेवाडी, थेऊर, पेरणे, शिक्रापूर, कोरेगाव भिमा, सणसवाडी, कोरेगाव मूळ आदी परिसरातील वीजपुरवठा बंद पडला. (Pimpri Chinchwad Power Outage)

पॉवर ग्रीडच्या अतिउच्चदाब ४०० केव्ही वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. मात्र त्यास सात ते आठ तास लागण्याची शक्यता आहे. दरम्यान महापारेषण व महावितरणच्या संयुक्त प्रयत्नातून भारव्यवस्थापनाद्वारे पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरु आहे. तर काही ठिकाणी नाईलाजाने चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागणार आहे. (Pune Mahavitaran News)

Web Title : Pimpri Chinchwad Power Outage | Fault in 400 KV High Voltage Power Lines; Power supply interrupted in Pimpri-Chinchwad, Urse, Shikrapur areas

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Crime | पुणे जिल्ह्यात खळबळ ! सुप्रिया सुळेंचे निकटवर्तीय माजी नगरसेवकाची जमिनीच्या वादातून कोयता आणि कुऱ्हाडीने हत्या

Pune Police News | फरासखाना पोलिसांकडून मोक्कातील फरार आरोपीला अटक; पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांच्याकडून पोलिस अंमलदाराचा सत्कार

Speaker Rahul Narvekar | 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निर्णयाला लागला वेग; विधानसभा अध्यक्ष आजच नोटीस देण्याची शक्यता

NCP Chief Sharad Pawar | “राष्ट्रवादीत उभी फूट म्हणजे शरद पवारांनी ठरवून केलेला कार्यक्रम”; पवारांच्या जुन्या सहकाऱ्याचा दावा

Pune Crime News | पुणे : ट्रेकला गेलेला तरुण पाण्यात गेला वाहून; मावळमधील कुंडमळ्यातील धक्कादायक घटना

Dr. Pradeep Kurulkar | प्रदीप कुरुलकरांची पाकिस्तानी गुप्तहेराबरोबर क्षेपणास्त्रांविषयी चर्चा; एटीएसच्या दोषारोपपत्रात धक्कादायक उल्लेख

Pune Crime News | पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 26 वी MPDA ची कारवाई ! विमाननगर परिसरात दहशत माजविणारा गुंड स्थानबद्ध