Pimpri Chinchwad RTO Office | शनिवार-रविवारी देखील पर्मनंट ड्रायव्हिंग लायसेन्ससाठी चाचणी

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन –  Pimpri-Chinchwad RTO Office | पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (Pimpri-Chinchwad RTO Office) वतीने 30 ऑक्टोबर आणि 31 ऑक्टोबर रोजी पर्मनंट ड्रायव्हिंग लायसेन्स चाचणी घेण्यात येणार आहे. याबाबत माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे (Atul Aade) यांनी दिली.

 

पर्मनंट ड्रायव्हिंग लायसेन्ससाठी (Permanent driving license) ऑनलाईन वेळ घेण्याचा प्रतिक्षा कालावधी कमी करण्याच्या उद्देशाने आणि शिकाऊ परवानाची मुदत ऑक्टोबर 2021 महिनाअखेरपर्यंत संपणाऱ्यांसाठी या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सबंधीत अर्जदारांनी नोंद घेऊन त्याप्रमाणे उपलब्ध ऑनलाईन वेळ घेण्याची कार्यवाही पूर्ण करावी.
तसेच, पक्के लायसेन्ससाठी 28 आणि 29 ऑक्टोबर रोजी प्रत्येक दिवशी 250 चा कोटा उपलब्ध होणार आहे.
चाचणीकरीता येताना मुखपट्टी व हातमोज्याचा, सुरक्षित अंतर आदी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
असं आवाहनही आरटीओकडून करण्यात आले आहे.

 

दरम्यान, 30 ऑक्टोबर रोजीच्या ऑनलाईन वेळा (स्लॉट) 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 5 वाजता,
तसेच 31 ऑक्टोबर रोजीच्या चाचणीसाठी ऑनलाईन (Online testing) वेळा 29 ऑक्टोबर रोजी उपलब्ध होतील.
त्याचबरोबर आवश्यक नोंदणी करून 30 ऑक्टोबर व 31 ऑक्टोबर 2021 रोजी पर्मनंट ड्रायव्हिंग लायसेन्स चाचणी करीता सकाळी 9 वाजता वेळेत उपस्थित रहावे.
अशी माहिती देण्यात आली आहे.

 

Web Title : Pimpri Chinchwad RTO Office | saturday sunday testing for permanent license information of sub regional transport officer atul aade

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 1,584 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

PM Jan Dhan Yojana | PMJDY ला मिळतोय जबरदस्त प्रतिसाद, 44 कोटी झाली पीएम जनधन बँक अकाऊंटची संख्या

Pune Jain Temple | लेक टाऊन येथील जैन मंदिरात ‘पंचान्हिका’ महोत्सवाची सांगता