EPFO कडून ऐन दिवाळीत कर्मचार्‍यांच्या पदरी पुन्हा निराशा, PF वर पुन्हा जुनाच 8.5% व्याजदर कायम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO | केंद्र सरकारने दिवाळीच्या तोंडावर देशभरातील सुमारे 5 कोटीपेक्षा जास्त नोकरदारांची निराशा केली आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2020-21 साठी एम्प्लॉई प्रॉव्हिडेंट फंड म्हणजे ईपीएफ (Employees’ Provident Fund) वर जुनाच 8.5 टक्के व्याजदर कायम ठेवण्यास मंजूरी दिली आहे. व्याजदर वाढवला जाईल अशी कोट्यवधी EPFO खातेधारक कर्मचार्‍यांची अपेक्षा होती, मात्र, जुनाच दर कायम ठेवण्यात आला आहे. 2016-17 मध्ये 8.65 टक्के असलेला व्याजदर सरकारने 7 वर्षात कमी करून 8.5 टक्केवर आणला आहे.

 

एम्प्लॉई प्रॉव्हिडेंट फंड ऑर्गनायजेशन किंवा ईपीएफओ (EPFO) च्या 5 कोटीपेक्षा जास्त खातेधारकांसाठी दिवाळीच्या अगोदर हा निर्णय घेतला आहे. कामगार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी म्हणजे सीबीटीने (Central Board of Trustees) यावर्षी मार्चमध्ये मागील आर्थिक वर्षासाठी एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड जमावर 8.5 टक्के व्याजदर ठरवला होता. सीबीटी ईपीएफओचा निर्णय घेणारी सर्वोच्च बॉडी आहे.

 

2019-20 साठी 8.5 टक्के होता व्याजदर

सूत्रांनी शुक्रवारी म्हटले की, अर्थ मंत्रालयाने 2020-21 साठी ईपीएफवर व्याजदराला मंजूरी दिली आहे. आता व्याज पाच कोटीपेक्षा जास्त अंशधारकांच्या खात्यात जमा केले जाईल. मागील वर्षी मार्चमध्ये, ईपीएफओने (EPFO) 2019-20 साठी एम्प्लॉई प्रॉव्हिडेंट फंडवर व्याजदर 7 वर्षात सर्वात कमी करत 8.5 टक्के केला होता. तो 2016-17 मध्ये 8.65 टक्के होता.

 

2016-17 मध्ये 8.65 टक्के होता व्याजदर

आर्थिक वर्ष 2019-20 साठी प्रदान करण्यात आलेला ईपीएफ व्याजदर 2012-13 च्यानंतरचा सर्वात कमी होता.
2012-13 मध्ये तो कमी करून 8.5 टक्के करण्यात आला होता.
ईपीएफओने आपल्या अंशधारकांना 2016-17 मध्ये 8.65 टक्के आणि 2017-18 मध्ये 8.55 टक्के व्याज दिले होते.
2015-16 मध्ये व्याजदर 8.8 टक्केपेक्षा थोडा जास्त होता.

 

Web Title :- EPFO | government approves 8 5 percent interest rate on employees provident fund for fy 2020 21

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil | ‘क्रांती रेडकरच नाही तर मलाही बाळासाहेबांची आठवण येते’ – चंद्रकांत पाटील

Pune News | राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा भाजपवर घणाघात, भाजप नगरसेवक धनराज घोगरेंच्या प्रकरणावरून म्हणाले – ‘ही तर संघटीत गुन्हेगारी’ (व्हिडीओ)

Pune News | राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा सभागृह नेते गणेश बिडकरांवर हल्लाबोल, प्रशांत जगताप म्हणाले – ‘आरोप करताना आपले हात धुतलेले आहेत का पहावं; 100 कोटींच्या प्रॉपर्टीवरून देखील…’ (व्हिडीओ)

Gangster Chhota Rajan | 38 वर्षांपूर्वी 2 पोलिसांना मारहाण करून त्यांच्या हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणात कुख्यात गँगस्टर छोटा राजन ‘निर्दोष’

Bhandara Crime | आईला शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाने शेजाऱ्याचा चिरला गळा; आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर