Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 154 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri-Chinchwad Corona) मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्ण संख्येत वाढ होत आहे. तर कोरोनामुक्त (Recover patient) होणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Pimpri Corona) संख्या वाढली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये 154 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झालेल्यांचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 154 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 68 हजार 631 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 104 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 63 हजार 206 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरामध्ये सध्या 1 हजार 294 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे. यापूर्वी मृत्यू झालेल्या एका रुग्णाचा अहवाल आज प्राप्त झाला. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4391 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
बुधवारी (दि.25) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खासगी कोविड लसीकरण केद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 17,421 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 13 लाख 70 हजार 348 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title : Pimpri Corona | 154 new patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corporation Amenity Space | अ‍ॅमिनिटी स्पेस बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव पुणेकर कदापि सहन करणार नाहीत – काँग्रेसचे गटनेते आबा बागुल

Pune Crime | व्याजाने पैसे देत उकळली अडीच लाखांची खंडणी; खाजगी सावकारी करणार्‍या ज्ञानेश्वर पवार आणि ओंकार तिवारीला अटक

Karad Crime | 2 चिमुकल्यांची गळा दाबून हत्या; आईचा आत्महत्येचा प्रयत्न