Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 334 सक्रिय रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover patient) प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 26 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 7077 संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 26 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 78 हजार 039 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 21 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 73 हजार 920 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. (Pimpri Corona)

 

शहरामध्ये सध्या 334 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यामध्ये 199 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये तर 135 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4516 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

सोमवार (दि.13) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 11 हजार 487 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 27 लाख 96 हजार 409 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title :- Pimpri Corona | 334 active patients of Corona in Pimpri Chinchwad, know other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pawandeep Rajan | अरुणिता कांजीलालला सोडून दुसरीसोबत रोमान्स करताना दिसला पवनदीप राजन, VIDEO पाहून चाहते थक्क झाले

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 83 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corona | राज्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत पुणे दुसऱ्या क्रमांकावर; जाणून घ्या सक्रिय रूग्णांची संख्या