Pimpri Crime Branch News | पिंपरी : मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखेकडून पिस्टलसह अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Crime Branch News | मोक्का गुन्ह्यातील (MCOCA Action) फरार असलेल्या आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून एक पिस्टल आणि दोन काडतुसे असा एकूण 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.15) रिव्हररोड सुभाषनगर येथील झुलेलाल मंदीराजवळ केली. जतिन उर्फ सोनू बिपीन टाक (वय-29 रा. रिव्हर रोड पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pimpri Crime Branch News)

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्यां विरोधात गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. पथकाकडून फरार आरोपींचा शोध घेत असताना सहायक पोलीस फौजदार दिपक खरात यांना माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील, मोक्का गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी सोनू टाक हा त्याच्या कमरेला पिस्टल लावून पिंपरी परिसरात फिरत आहे.

त्यानुसार पथकाकडून आरोपीचा शोध घेत असताना तो सुभाषनगर येथील झुलेलाल मंदीराजवळ थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथाने परिसरात सापळा लावला. पोलीस आल्याची चाहूल लागताच सोनू टाक पळून जाण्याच्या तयारीत असताना पथकाने त्याला पकडले. त्याची अंगझडती घेऊन पिस्टल व दोन काडतुसे जप्त केली.

आरोपी सोनू टाक हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, जबरीचोरी, मारामारी, आर्म अॅक्ट,
दुहेरी मोक्का असे एकूण 16 गंभीर गुन्हे आहेत. 2023 मध्ये गणपती विसर्जनाच्या दिवशी रोहित वाघमारे याच्यासोबत भांडण-मारामारी करुन पिस्टल रोखून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा पासून तो फरार होता. या गुन्ह्यात सोनू टाक याच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. आरोपीवर पिंपरी पोलीस ठाण्यात सोनू टाक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अंमलदार अजित सानप यांनी फिर्याद दिली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदिप डोईफोडे,
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे सतिश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम,
पोलीस उपनिरीक्षक केराप्पा माने, सहायक पोलीस फौजदार दिपक खरात, दिलीप चौधरी, जमीर तांबोळी, विपुल जाधव,
नामदेव कापसे, सागर अवसरे, अजित सानप, शिवाजी मुंढे, उद्धव खेडकर यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

जुन्या वादातून धारदार शस्त्राने वार, 5 आरोपींना अटक; कोंढवा पोलिसांची कारवाई

पुणे : भररस्त्यात मिठी मारुन तरुणीचा विनयभंग, आरोपीला अटक

दारुच्या नशेत महिलेवर बलात्कार, जंगली महाराज रोडवरील घटना