Pimpri Crime News | कला दिग्दर्शक राजू साप्ते आत्महत्या प्रकरणी व्हिडीओत नाव घेतलेल्या नरेश मिस्त्रीला अटक

पिंपरी (Pimpri) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pimpri Crime News | मराठमोळा कला दिग्दर्शक राजेश साप्ते (Marathi Art Director Raju Sapte) यांनी आत्महत्या करीत असल्याचा व्हिडिओ (Video) शेअर करित गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) पाच जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला असून बिझनेस पार्टनर चंदन ठाकरे (Chandan Thackeray) याला वाकड पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. या प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. नरेश मिस्त्री (Naresh Mistry Arrest) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
Pimpri Crime News | बलात्कारातून 12 वर्षाची मुलगी राहिली गरोदर; वाकड पोलीस ठाण्यात FIR दाखल

pimpri crime news | naresh mistry arrested in marathi art director rajesh sapte suicide case

प्रसिद्ध मराठी कला दिग्दर्शक राजेश साप्ते (Marathi Art Director Raju Sapte Suicide) यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं होतं असा आरोप करण्यात आला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी राजेश साप्ते यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला (Rajesh Sapte shared a video on social media) होता. यामध्ये त्यांनी नरेश मिस्त्रीचं (Naresh Mistry) नाव घेतलं होतं. तो बऱ्याच काळापासून धमक्या (Threat) देत होता असा आरोप राजेश यांनी केला. व्हिडिओमध्ये नरेश याचे नाव असल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी सोनाली राजेश साप्ते Sonali Rajesh Sapte यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद (Wakad Police Station) दिली आहे. त्यानुसार वाकड पोलिसांनी (wakad Police) पाच जणांवर गुन्हा (Fir) दाखल केला आहे.

Gold Price Today । चांदी 70 हजारच्या पुढे, जाणून घ्या सोन्याचे आजचे दर

राजेश साप्ते (Rajesh Sapte ) यांना आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली . राजेश साप्ते यांनी एक सुसाईड नोट आणि एक व्हिडिओ रेकॉर्ड केला (Rajesh Sapte recorded a suicide note and a video) होता. त्यातून त्यांना काही जणांनी त्रास दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण पाच आरोपींवर कट रचून राजेश साप्ते यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच, लेबरला कामावर येऊ देणार
नाही. याशिवाय व्यावसायिक नुकसान करण्याची देखील धमकी देण्यात आली होती. राजेश यांना
दहा लाख रुपये आणि प्रत्येक प्रोजेक्टमागे एक लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती.
राजेश यांना अडीच लाख रुपये द्यावे लागले होते, असं सोनाली साप्ते यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

वाकड पोलिसांनी (wakad Police) नरेश विश्वकर्मा (मिस्त्री) Naresh Vishwakarma
(Mistry), गंगेश्वर श्रीवास्तव (संजुभाई) Gangeshwar Srivastava (Sanjubhai), राकेश
मौर्य Rakesh Maurya, चंदन रामकृष्ण ठाकरे Chandan Ramakrishna Thackeray
आणि अशोक दुबे (Ashok Dubey) यांच्यावर गुन्हा (Fir) दाखल केला आहे. तर चंदन ठाकरे
याला मुंबईतून अटक (Chandan Thackeray arrested from Mumbai) करण्यात आली
आहे. याप्रकरणात आतापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करित
आहेत.


ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : pimpri crime news | naresh mistry arrested in marathi art director rajesh sapte suicide case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update