Pimpri Crime News | पिंपरी : शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून आठवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Crime News | पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेतील (PCMC School) इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून एका 14 वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. जिन्याच्या रेलिंगवर घसरगुंडी खेळताना ही घटना घडली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनी पोलिसांना दिले आहे. सार्थक हर्षवर्धन कांबळे असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Pimpri Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, सार्थक कांबळे हा विद्यार्थी हुतात्मा चाफेकर विद्यालय मध्ये इयत्ता आठवी मध्ये शिकतो. शुक्रवार (दि.16) सकाळी सार्थक शाळेच्या आवारात खेळत होता. यावेळी घसरगुंडी खेळण्याच्या नादात तिसऱ्या मजल्यावरील जिन्याच्या ग्रील वरून तो खाली पडला. या घटनेनंतर त्याला तातडीने नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जिन्याच्या ग्रील ला सुरक्षा जाळी बसवली नाही.
त्यामुळे सार्थक कांबळे याचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडल्यानंतर शाळेतील शिक्षकांनी तेथून पळ काढल्याचे प्रत्यदर्शी लोकांनी सांगितलं.
तसेच शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी मृत मुलाच्या नातेवाईकांनी केली आहे.
सार्थक याच्या अचानक जाण्याने त्याच्या आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

जुन्या वादातून धारदार शस्त्राने वार, 5 आरोपींना अटक; कोंढवा पोलिसांची कारवाई

पुणे : भररस्त्यात मिठी मारुन तरुणीचा विनयभंग, आरोपीला अटक

दारुच्या नशेत महिलेवर बलात्कार, जंगली महाराज रोडवरील घटना