Pimpri Crime | PMPML बसची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू, एकजण जखमी

वाकड : पोलीसनामा ऑनलाइन –  Pimpri Crime | भरधाव वेगात जाणाऱ्या पीएमपीएमएल बसची (pmpml bus) एका दुचाकीला धडक (hits two wheeler) बसली. यामध्ये दुचाकीवरील एका व्यक्तीचा मृत्यू (one killed) झाला तर एकजण गंभीर जखमी (one injured) झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (दि.27) सकाळी सव्वासातच्या सुमारास थेरगाव येथील आठवण चौकात घडला आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad police station) गुन्हा (Pimpri Crime) दाखल करण्यात आला आहे.

संतोष देवराम शिंदे (वय-48 रा. काळेवाडी, रहाटणी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
तर हनुमंत पांडुरंग पवार (वय-45 रा.थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी पीएमपीएमएल बस चालक संतोष दत्तात्रय पोळ (वय-38 रा. थेरगाव) याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवार आणि मयत शिंदे हे त्यांच्या दुचाकीवरुन
(एमएच 14 सीएच 2616) थेरगाव येथील आठवण चौक येथून जात होते.
रस्ता ओलांडत असताना इलेक्ट्रिक पीएमपीएमएल बसने (एमएच 12 एसएफ 4951)
(Electric PMPML bus) पवार यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली.
यामध्ये शिंदे यांचा गंभीर जखमी मृत्यू झाला. तर पवार गंभीर जखमी झाले आहे.
याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pimpri Crime | One killed, one injured in PMPML bus collision

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Biodiesel | आता शिल्लक खाद्यतेलाद्वारे तयार बायो-डिझेलवर धावणार तुमची कार, डिझेलपेक्षा 40 टक्के ‘स्वस्त’, जाणून घ्या

Virgin Hyperloop | केवळ 1 तास 22 मिनिटाचा असेल दिल्ली ते मुंबई प्रवास, येतीय जबरदस्त टेक्नॉलॉजी, जाणून घ्या कशी करणार काम?

Mumbai Police | वस्तू गहाळ झाल्याची पोलीस ठाण्यात तक्रार देताना अ‍ॅफिडेव्हिटची गरज नाही, मागणी केल्यास होणार कारवाई