Pimpri Extortion Case | पिंपरी : शस्त्राची भिती दाखवून वकिलाकडे खंडणीची मागणी, आरोपी गजाआड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Extortion Case | शस्त्राचा धाक दाखवून साथीदारावर गुन्हा दाखल करतो काय असे म्हणत एका वकिलाला जीवे मारण्याची धमकी दिली (Death Threat) . तसेच त्यांच्याकडे 10 हजार रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी (Pimpri Police) एका आरोपीला अटक केली आहे. हा प्रकार 28 फेब्रुवारी रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास डॉ. डी.वाय. पाटील हॉस्पीटल (DY Patil Hospital) रस्त्यावर घडला आहे.(Pimpri Extortion Case)

याप्रकरणी प्रज्वल ऊर्फ राहूल कमलेश दुबे (वय 30 रा. संततुकाराम नगर, पिंपरी) यांनी शुक्रवारी (दि.12) पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून पिंपरी पोलिसांनी शुभम कांबळे (रा. संततुकारामनगर) याला अटक केली आहे. तर त्याच्या इतर दोन साथीदारांवर आयपीसी 385, 387, 506, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे प्राणीमित्र असून वकील देखील आहेत. आरोपीने फिर्यादी यांना शस्त्र असल्याचा धाक दाखवून 10 हजार रुपयांची खंडणी मागणी केली. यावेळी फिर्यादी यांनी पैसे नसल्याचे सांगितले. त्यावेळी आरोपीने धमकी देऊन साथीदार दिपक मोहिते याच्या विरोधात गुन्हा दाखल का केला म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच माझ्या विरोधात तक्रार दिली तर मी जेलमधून बाहेर आल्यावर तुला मारुन टाकीन अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी 28 फेब्रुवारी रोजी रात्री पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

तर काकडे कुटुंबियांच्या भेटीबाबत शरद पवार म्हणाले, काकडे परिवाराची ५५ वर्षांनंतर भेट घेतल्याची माहिती चुकीची आहे.
काकडे कुटुंबात दुःखद घटना घडल्याने मी सांत्वनपर भेटीसाठी गेलो होतो.
त्या कुटुंबाचे प्रमुख बाबालाल काकडे यांच्या निधनानंतरही मी भेट घेतली होती.
अशा सांत्वनपर भेटी एक सभ्यता व सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे.

पवार म्हणाले, आपल्या परिसरात महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या एखाद्या कुटुंबात अशा घटना घडतात तेव्हा सांत्वनपर
भेट घेतली जाते. बाकी त्यात काही नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Raid On Spa Center In Sangvi | सांगवी येथे स्पा सेंटरमध्ये चालणाऱ्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका (Video)

Raj Thackeray On Vasant More | वसंत मोरेंबाबत प्रश्न विचारताच राज ठाकरे यांनी ‘अशी’ दिली प्रतिक्रिया, म्हणाले… (Video)