पिंपरी : अनैतिक संबंधावरुन जाब विचारणार्‍या पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या पतीला अटक

पिंपरी : अनैतिक संबंधावरुन जाब विचारल्याने मारहाण करुन छळ केल्याने विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी आत्महत्येस (suicide) प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करुन पतीला अटक केली आहे.

प्रतिक माणिक कांबळे (वय ३०, रा. सुदर्शनगर, पिंपळेगुरव) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. श्रृती प्रतिक कांबळे (वय २४) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिची सासू, नंणद व तिचा पती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भिमा अंबाजी गायकवाड (वय ५२, रा. साईनगर, कात्रज) यांनी सांगवी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

श्रृती आणि प्रतिक कांबळे यांचा २०१७ मध्ये विवाह झाला होता. तेव्हापासून घरगुती कारणावरुन वाद घालून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. प्रतिक याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे श्रृतीला समजल्याने त्याचा तिने जाब विचारला होता. या कारणावरुन तो तिच्याशी नेहमी वाद घालून हाताने मारहाण करीत असे. या छळाला कंटाळून श्रृती हिने २८ मे रोजी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे अधिक तपास करीत आहेत.

 

Also Read This : 

 

 

हिवाळयात ‘हे’ सूप बनवेल तुमची इम्यूनिटी आणखीन मजबूत, आजारपण देखील राहील दूर, जाणून घ्या

 

Maratha Reservation : प्रकाश आंबेडकरांनी खा. संभाजीराजेंना सांगितला ‘हा’ कायदेशीर मार्ग
अ‍ॅसिडीटीच्या समस्येमुळे तुम्ही खुपच असाल परेशान तर ‘हे’ घरगुती उपाय करा, खुपच कामाला येतील, जाणून घ्या

 

Corona Vaccination : उच्च शिक्षणासाठी विदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांना प्राधान्याने लस मिळणार – आदित्य ठाकरे

 

 

कोरोना झालेल्या रग्णांना मधुमेहाचा धोका असतो? संशोधन काय म्हणते ते जाणून घ्या