Pimpri News : पतीच्या अनैतिक संबंधामुळे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पतीचे बाहेर अनैतिक संबंध असल्यावरुन होणार्‍या वादात मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून एका २१ वर्षाच्या विवाहितेने पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वाकड पोलिसांनी तिचा पती सागर शिवाजी इटकर (वय २३, रा. क्रांतीवीर कॉलनी, नढेनगर, काळेवाडी) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर इटकर याचे इतर महिलांसोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे त्यांचे पत्नीबरोबर वादावादी होत होती. त्यात तो तिला मारहाण करुन त्रास देत होता़. तसेच व्यवसायासाठी माहेराहून पैसे घेऊन ये, अशी मागणी तो करत होता. त्याच्या छळाला कंटाळून विवाहितेने राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक मणेर अधिक तपास करीत आहेत.