Pimpri : सांगवीमध्ये अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – अल्पवयीन मुलीचे फोटो मित्रांना सोशल मीडियावर शेअर करुन बदनामी केली. मुलीने नैराश्येतून राहत्या घरामध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि.12) दुपारी एकच्या सुमारास सांगवी येथील विश्वशांती कॉलनीत घडली. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

मुलीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या विजय दत्तराव पवार (रा. प्रसादनगर, ता. जि. परभणी, सध्या रा. विश्वशांती कॉलनी पिंपळे सौदगर) याला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने मंगळवारी (दि.13) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 16 वर्षांची मृत मुलगी आणि आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे आहे. आरोपीने मुलीसोबत काढलेले फोटो त्याच्या फेसबुक, इन्स्टाग्रामवर शेअर केले. तसेच मित्र ओकांर सरवदे, वैभव मुलमुले व अनिकेत पवार (सर्व. रा. पिंपळे सौदागर) यांना टॅग केले. मुलीला त्यांच्यासोबत बोलण्याची इच्छा नसताना तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. याशिवाय तिचा पाठलाग करुन तिची बदनामी केली. बदनामीमुळे मुलीने नैराश्येतून सोमवारी दुपारी एकच्या सुमारास राहत्या घरामध्ये छताच्या अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.