पिंगोरीत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – पिंगोरी (ता. पुरंदर ) येथे बिबट्याने केलेल्या हल्यामध्ये शेळी ठार झाली. घरा शेजारीच शेळीवर बिबट्याने हल्ला केल्यामुळे पिंगोरीमधील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पिंगोरी येथील गावाशेजारीच असलेल्या भोसलेवस्ती मधील भिमराव धोंडीबा भोसले यांच्या घरा पुढे असलेल्या शेळीवर बिबट्याने चार दिवसांंपुर्वी हल्ला केला. त्यांनी आरडा ओरडा केल्याने बिबट्याने शेळी तिथेच सोडून पळ काढला. मात्र बिबट्याच्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली होती.भोसले यांनी शेळीवर औषधोपचार केले .मात्र गंभीर जखमी झाल्याने अखेर शेळीचा मृत्यू झाला.याबाबतची माहिती पिंगोरीचे पोलिस पाटील राहुल शिंदे यांनी वनविभागाला दिल्या नंतर वनविभागाचे वनरक्षक बाळासाहेब गोलांडे व बाळासाहेब चव्हाण यांनी घटनास्थळी पंचनामा केला असुन भोसले यांना वनविभागाकडुन नुकसान भरपाई देण्यात येईल असे सांगीतले आहे.

पिंगोरी परिसरात बिबट्या व अन्य वन्यप्राण्यांचा वावर आहे. या पुर्वी सुध्दा या गावातील जनावरे बिबट्याने मारली आहेत.त्यांंना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. त्याच बरोबर बिबट्याला पकडण्यासाठी या भागात पिंजराही लावण्यात आला आहे. परंतु तो अजुन पिंजऱ्यात आला नाही. लवकरच त्याला पकडण्यासाठी वनविभागाकडुन विशेष मोहीम राबवण्यात येईल. तो पर्यंत लोकांनी शेतात वावरताना सावधानता बाळगावी.