चीनी एअरफोर्स करतोय ‘मोठी’ तयारी ! इंडियन एजन्सीनं केलं ‘ड्रॅगन’चं कृत्य ‘कैद’, भारतीय वायुसेनेनं घेतलं मनावर

नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये चीनशी सुरू असलेला वाद पाहता भारतीय एजन्सीज खुप सावध आहेत. भारतीय एजन्सीज अरूणाचल प्रदेशच्या उत्तरमध्ये लडाखच्या दुसरीकडे एलएसीवर पीपल्स लिब्रेशन आर्मीच्या हवाई दलाच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. सरकारी सूत्रांनी सांगितले की, शिनजियांग आणि तिबेट क्षेत्रात प्लाफच्या होटन, गर गुनसा, काशघर, होपिंग, डोंका डोंग, लिन्झी आणि पंगट एयरबेसवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

सूत्रांनी सांगितले की, चीनी एयर फोर्सने अलिकडच्या काही दिवसात आपल्या अनेक एयरबेसला अपग्रेड केले आहे. चीन हवाई दलाने हार्डेन शेल्टर्सही बांधले आहेत आणि रनवेच्या लांबीचा विस्तार केला आहे. सोबतच ऑपरेशन्स पार पाडण्यासाठी मोठ्या संख्येने अतिरिक्त जवान तैनात केले आहेत. सूत्रांनी हे सुद्धा सांगितले की, भारताच्या पूर्वोत्तर राज्यांच्या समोर दुसरीकडे चीनचा लिनझी एयरबेस आहे. हा प्रामुख्याने हेलिकॉप्टर बेस आहे. चीनने जवळच्या भारतीय क्षेत्रात आपल्या देखरेखीच्या हालचाली वाढवण्यासाठी हेलिपॅडचे एक नेटवर्कसुद्धा बनवले आहे.

सूत्रांनी सांगितले की, जगाच्या समोर चर्चा आणि शांततेचा दिखावा करणार्‍या चीनने लडाख सेक्टर आणि भारताला लागून असलेल्या अन्य क्षेत्रात आपली लढाऊ विमाने तैनात केली आहेत. या लढाऊ विमानांमध्ये सुखोई-30 ची चीनी आवृत्ती आणि स्वदेशी जे-सीरीजची बॉम्बर विमाने आहेत. भारतीय एजन्सीज उपग्रह आणि अन्य माध्यमातून या सर्व लढाऊ विमानांवर लक्ष ठेवून आहेत. भारतीय हवाई दलाने सुद्धा चीनी लष्काराच्या या हालचाली पाहता आपली तयारी पूर्ण केली आहे.

भारतीय हवाई दलाने चीनच्या कोणत्याही कारवाईला तोंड देण्यासाठी प्रमुख एयरबेसवर सुखोई-30, सुखोई-30 एमकेआय, मिग-29 आणि मिराज-2000 चा आपला ताफा तैनात केला आहे. मागील काही दिवसात हवाई दल प्रमुख एयर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी पश्चिमी कमांडमध्ये एका फ्रंट लाइन एयरबेसवर मिग-21 बायसन जेट विमानातून उड्डाण घेतले होते आणि ऑपरेशनल तयारीचा आढावा घेतला होता. सोबतच शत्रूला कठोर संदेश दिला की, त्याच्या प्रत्येक कृतीला उत्तर दिले जाईल.

चीनसोबतच्या तणावाच्या पहिल्या टप्प्यात (एप्रिल-मे) भारतीय लष्कराने आपल्या प्रमुख मोर्चावर एसयू-30 आणि मिग-29एस तैनात केले होते. भारतीय हवाई दलाच्या या तैनातीमुळे पूर्व लडाखमध्ये चीनी विमानांच्या भारतीय क्षेत्रात घुसखोरीला आळा बसला होता. सूत्रांनी सांगितले की, लडाख क्षेत्रात भारतीय हवाई दल चीनी एयरफोर्सवर भारी पडू शकते, कारण चीनी लढाऊ विमानांना खुप उंचीवरील ठिकाणांवरून उड्डाण घ्यावे लागते. भारतीय विमाने मैदानी प्रदेशातून एका झटक्यात चीनी प्रदेशात आक्रमण करू शकतात.