मुलींच्या पहिल्या शाळेचा साक्षिदार भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहिर करा- संतोष शिंदे

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन
देशातील मुलींची पहिली शाळा महात्मा जोतिबा फुले यांनी येथील भिडे वाड्यात सुरू केली. यानंतर देशात मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. मात्र अद्यापही या वारसा स्थळाला राष्ट्रीय स्मारक म्हणून मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे मुलींच्या पहिल्या शाळेचा साक्षिदार असलेला भिडेवाडा लवकरात-लवकर राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहिर करण्याची मा़गणी भिडेवाडा बचाव मोहिमेच्या अंतर्गत संतोष शिंदे यांनी केली आहे.
[amazon_link asins=’B07B6DM75J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’465eedc9-a482-11e8-a9da-b7b74beefa25′]
महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना सोबत घेवून पुण्यामध्ये शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. प्रसंगी दगडगोटे, शेण अंगावर झेलून शिक्षणाचे महत्व समाजाला पटवून दिले. शिक्षणाचे माहेर घर म्हणून अोळखल्या जाणाऱ्या या पुण्याला फुलेंच्या चळवळीचा पाया आहे.
एवढेच नाही तर कष्टकरी- शेतकरी- श्रमकरी व बहुजन समाजासाठी फुलेंनी नेहमीच आवाज उठवला. शेतकऱ्यांचा आसूड घेवून गुलामगिरीची व्यथा समाजाला कणखर शब्दात सांगितली. आणि प्रस्थापित व्यवस्थांच्या विरोधात बंड पुकारले. परिवर्तनवादी चळवळीला पुरोगामी विचारांची जोड देवून, बहुजनांना शिक्षणाचे क्रांतिकारी दुध पाजणाऱ्या या महात्म्याला भारतरत्न मिळाला पाहिजे. परंतू उपेक्षितांसाठी जगणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांचा समाज आणि राज्यकर्ते दखल घेत नाहीत म्हणून आपल्या महापुरूषांची स्मारके जतन करुन त्यातून प्रेरणा घेण्याचं काम तरुण कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे असे मत संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा या मागणीसाठी सावित्री बाईंची जन्मभूमी नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथून गुरूवार दिनांक 16 आॅगस्ट ते 20 आॅगस्ट  पर्यंत पायी मशाल रॅली काढण्यात आल्याची माहिती देखील देण्यात आली. सदरच्या रथ यात्रेचे संयोजन सपना माळी, कल्याण जाधव, अमर हजारे, कल्याण राऊत , प्रशांत फुले यांनी केले.
[amazon_link asins=’B079RF37W3′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5051c534-a482-11e8-909a-61d007c5875a’]
महात्मा फुलेवाडा गंजपेठ येथे रथ यात्रेचे स्वागत करुन विठ्ठल सातव आणि सुनिता भगत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण  करण्यात आला. यावेळी संतोष शिंदे, रुपालीताई, विठ्ठल सातव, सुनिता भगत, सपना माळी, प्रदिप बनसोडे, प्रशांत फुले, कल्याण जाधव, वृषाली शिंदे, सुरेश गायकवाड, संदीप लडकत, मनिषा लडकत, रोहिदास शिंदे, राजाराम बोबडे, वैशालीताई नेवसे, नितीन झगडे, रोहित चव्हाण, सागर भुमकर, अानंदा कुदळे हनुमंत माळी, गणेश माळी, सुरेष तनपुरे, चंद्रशेखर घाडगे, नरेश सोलंकी,संजय कोकरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या सपना माळी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.