PM Kisan | खुशखबर ! ‘या’ दिवशी शेतकर्यांच्या खात्यात येतील 2,000 रुपये; येथे चेक करा यादीत तुमचे नाव आहे किंवा नाही
नवी दिल्ली : वृत्तसंस्था (Policenama Online) – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) अंतर्गत शेतकर्यांच्या खात्यात लवकरच पुढील हप्ता टाकला जाईल. PM Kisan चा पुढील हप्ता म्हणजे नववा हप्ता (PM Kisan 9th Installment) ऑगस्टमध्ये येईल. केंद्र सरकार पीएम किसान योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थी शेतकर्यांच्या खात्यात 2,000 रुपये ट्रान्सफर करते. आतापर्यंत या योजनेच्या अंतर्गत सरकारने आठ हप्ते शेतकर्यांच्या खात्यात पाठवले आहेत. याचा उद्देश शेतकर्यांचे उत्पन्न वाढवणे आहे.
तुम्हाला पैसे मिळाले की नाही असे चेक करा
1. सर्वप्रथमच अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.
2. होमपेजवर Farmers Corner चा ऑपशन दिसेल.
3. Farmers Corner सेक्शनमध्ये Beneficiaries List ऑपशनवर क्लिक करा.
4. नंतर ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
5. यानंतर Get Report वर क्लिक करा. नंतर लाभार्थ्यांची पूर्ण लिस्ट समोर येईल, ज्यामध्ये तुमचे नाव शोधा.
आपल्या हप्त्याचे स्टेटस असे चेक करा
पीएम किसान वेबसाईट pmkisan.gov.in वर जाऊन. होम पेजवर मेन्यू बार पहा आणि येथे फार्मर कार्नर वर जा. येथे बेनिफिसरी स्टेटसवर क्लिक करा. आता या पेजवर तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेण्यासाठी 3 पर्याय दिसतील. आधार नंबर, अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर, (Aadhaar number, account number, mobile number) यापैकी एक पर्याय निवडा. जो पर्याय निवडला आहे, त्यामध्ये तो नंबर टाका. तो नंबर टाकून गेट डाटा वर क्लिक करा. आता तुम्हाला या प्रकारे स्टेटस दिसेल.
Web Titel :- pm kisan 9th installment 2000 rupees will released on august 2021 check list
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
स्मार्टफोन चोरीला गेला तर सर्वप्रथम करा ‘ही’ 4 कामे, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान; जाणून घ्या
Pune News | पुण्याच्या बिबवेवाडीत हॉटेलला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरु
स्वत:ला महाशक्ती दर्शवण्याच्या प्रयत्नात चीनच्या एयरफोर्सकडून झाली ‘ही’ मोठी चूक, जगभरात झाले हसू