PM Kisan | पीएम किसानच्या नवीन यादीतून कोणा-कोणाचे नाव वगळले?, ‘या’ पद्धतीने तपासा तुमच्या संपूर्ण गावाची यादी; जाणून घ्या

नवी दिल्ली : PM Kisan | पीएम किसान सम्मान निधी अंतर्गत (PM Kisan) केंद्र सरकारने 9व्या हप्त्याचे आतापर्यंत 9,94,67,855 शेतकर्‍यांच्या खात्यात 2000-2000 रुपयांची रक्कम पाठवली आहे. आतापर्यंत एकुण 12.13 कोटीपेक्षा जास्त शेतकरी या योजनेत नोंदणीकृत आहेत, आणि लाभ घेत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर गावचे सरकार बदलले आहे, अशावेळी नवीन लिस्टमधून तुमचे नाव तर कापले गेले नाही ना? हे जाणून घेण्यासाठी आता तुम्ही संपूर्ण गावाची यादी तपासू शकता. या बदलानंतर वृद्ध पेन्शन असो की, विधवा पेन्शन, किंवा इतर सरकारी योजनांचा लाभ घेणार्‍या लोकांची नावे योजनेतून गायब होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

अशी पहा पूर्ण यादी

1. सर्वप्रथमच अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.

2. होमपेजवर Farmers Corner चा ऑपशन दिसेल.

3. Farmers Corner सेक्शनमध्ये Beneficiaries List ऑपशनवर क्लिक करा.

4. नंतर ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.

5. यानंतर Get Report वर क्लिक करा. नंतर लाभार्थ्यांची पूर्ण लिस्ट समोर येईल, ज्यामध्ये तुमचे नाव शोधा.

Anti Corruption Pune | पिंपरीनंतर आता पुणे मनपातील बडा अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, प्रचंड खळबळ

ही आहे पूर्ण प्रक्रिया

पीएम किसान वेबसाईट pmkisan.gov.in वर जाऊन. होम पेजवर मेन्यू बार पहा आणि येथे फार्मर कार्नर वर जा. येथे बेनिफिसरी स्टेटसवर क्लिक करा. आता या पेजवर तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेण्यासाठी 3 पर्याय दिसतील. आधार नंबर, अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर, यापैकी एक पर्याय निवडा. जो पर्याय निवडला आहे, त्यामध्ये तो नंबर टाका. तो नंबर टाकून गेट डाटा वर क्लिक करा. आता तुम्हाला या प्रकारे स्टेटस दिसेल.

अशी चेक करा गडबड

पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा आधार नंबर दुरूस्त करू शकता. यासाठी तुम्ही https://www.pmkisan.gov.in/updateaadharnobyfarmer.aspx येथे क्लिक करा. याशिवाय जर तुमच्या नावात चूक असेल किंवा अकाऊंट नंबर दुरूस्त करायचा असेल तर वेबसाइटच्या होम पेजवर तुम्ही Benificary status वर क्लिक करून ते दुरूस्त करू शकता.

या कारणामुळे सुद्धा अडकू शकतो हप्ता

असे शेतकरी जे माजी किंवा सध्या संविधानिक पद धारक आहेत, वर्तमान किंवा माजी मंत्री आहेत,
महापौर किंवा जिल्हा पंचायत अध्यक्ष आहेत, आमदार, खासदार आहेत त्यांना शेतकरी असले तरी
या योजनेचा लाभ मिळणार नाही.

केंद्र किंवा राज्य सरकारमधील अधिकारी आणि 10 हजारेपक्षा जास्त पेन्शन घेणारे शेतकरी यांना लाभ मिळणार नाही. व्यवसायिक, डॉक्टर, इंजिनियर, सीए, वकील, आर्किटेक्ट, जे शेती करत असले तरी त्यांना लाभ मिळणार  नाही.

इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी सुद्धा या लाभापासून वंचित असतील. केंद्र आणि राज्य सरकारचा
मल्टी टास्किंग स्टाफ/चतुर्थ श्रेणी/गट डी कर्मचार्‍यांना लाभ मिळेल.

हे देखील वाचा

Narayan Rane | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर वादग्रस्त विधानामुळे पुण्यासह नाशिक, महाड मध्ये गुन्हे दाखल, अटक होणार?; नाशिक, पुण्याहून पोलीस पथक चिपळूणला रवाना

Transfer | पुणे-पिंपरीतील अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, डॉ. संजय शिंदे, रामनाथ पोकळे यांच्या बदल्या; IPS सुधीर हिरेमठ यांना पदोन्नती तर पुण्यात ‘या’ अधिकाऱ्याची नियुक्ती

IPS Transfer Maharashtra Police | 8 अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसह राज्यातील 37 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, सोलापूर, नवी मुंबई, पिंपरी आयुक्तालयातील अधिकाऱ्यांचा समावेश

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  pm kisan latest news whose name was removed from the new list of pm kisan check here entire village list pm kisan samman nidhi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update