PM Kisan | पीएम किसानच्या हफ्त्यासाठी असे करा नवीन रजिस्ट्रेशन! फॉलो करा ‘या’ महत्त्वाच्या स्टेप्स

पोलीसनामा ऑनलाइन – देशातील कष्टकरी शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या पीएम किसान योजनेचा लाभ कोट्यवधी शेतकरी घेत आहेत. पीएम किसान (PM Kisan) योजनेंतर्गत शेतकऱ्यांना काही रक्कम ही बॅंकेंत भारत सरकार मार्फत दिली जाते. सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत करते. प्रत्येकी चार महिन्याला दोन हजार रुपयांच्या हप्त्याने हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात. नुकताच 27 जुलैला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान (PM Kisan) योजनेचा 14 वा हफ्ता ट्रान्सफर (PM KISAN Payment) करण्यात आला. आता लगेचच पुढील शेतकरी पीएम किसान योजनेच्या हप्त्यासाठी रजिस्ट्रेशन (PM Kisan Registration) सुरु करण्यात आले आहे. हे रजिस्ट्रेशन कसे करावे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया.

पंतप्रधान किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) अर्थात पीएम किसान योजना (PM Kisan Yojana) ही शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना ठरत आहे. आत्तापर्यंत 14 हफ्ते हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. काही दिवसांपूर्वी ट्रान्सफर करण्यात आलेल्या 14 व्या हफ्त्याचा लाभ हा तब्बल 8.5 कोटी शेतकऱ्यांनी घेतला आहे. आता पुढील पीएम किसान हफ्त्यासाठी रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे. यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर (PM Kisan official website) जाऊन अर्ज करायचा आहे. या अर्जासाठी अधिकृत वेबसाईटच्या कोपऱ्यात फार्मर्स असा ऑप्शन दिसून येईल. यानंतर, New Farmer या पर्यायावर क्लिक करून नवीन नोंदणी करता येणार आहे.

पीएम किसान योजनेसाठी रजिस्ट्रेशन करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते. नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी फार्मर या ऑप्शनमध्ये ‘रुरल’ आणि ‘अर्बन’ असे दोन पर्याय असतील. त्यामधील गावाकडील शेतकरी असेल तर रुरल आणि शहरातील शेतकरी असेल तर अर्बन असे निवडावे. त्यानंतर आधार कार्ड व मोबाईल क्रमांक रजिस्टर करावा. यानंतर आपला प्रदेश म्हणजे विभाग निवडावा. त्यानंतर ओटीपी मिळवण्यासाठी Get OTP या ऑप्शनवर क्लिक करावे. आलेला ओटीपी टाकावा आणि प्रोसेस करावे.

पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट https://pmkisan.gov.in/ ओटीपी टाकल्यानंतर महत्त्वाची प्रोसेस सुरु होते.
यानंतर मागितली जाणारी प्रत्येक डिटेल ही काळजीपूर्वक भरावी.
यामध्ये आधार ऑथेंटिकेशन (Aadhar Authentication) ही प्रक्रिया सुरु होईल.
यामध्ये डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. ते केल्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करावे.
पीएम किसान योजनेसाठी अर्ज स्विकारल्यानंतर एक पॉप मेसेज स्क्रीनवर येईल.
असा मेसेज आल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले असे समजावे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी अर्थात पीएम किसान योजना (PM Kisan) याचा करोडो शेतकरी लाभ घेत असून
यामुळे दरवर्षी 6 हजार रुपये खात्यामध्ये जमा होत आहेत. लवकरच 15 वा हफ्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Income Tax | नोकरदार वर्ग वाचवू शकतो टॅक्स; ‘या’ आहेत काही गुंतवणुकी ज्यामुळे टॅक्स सेव्ह करणे होईल सोपे