PM KISAN Scheme : शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! ‘या’ तारखेला येणार तुमचे 2000 रूपये, ‘या’ पध्दतीनं तपासा यादीतील तुमचं नाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जर तुम्ही सुद्धा पीएम किसान सन्मान निधीसाठी रजिस्ट्रेशन केले असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. लवकरच सरकार तुमच्या खात्यात 2000-2000 रुपये क्रेडिट करणार आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी 3 हप्त्यात शेतकर्‍यांना सरकार 6,000 रुपयांची आर्थिक मदत करते. तुमच्या 8 व्या हप्त्याचे पैसे लवकरच मिळतील. या योजनेतून 9.5 कोटी लाभार्थी शेतकर्‍यांच्या खात्यात एका हप्त्याचे 2,000 रुपये येतात.

दरवर्षी सामान्यपणे या योजनेचा पहिला हप्ता 20 एप्रिलपर्यंत येतो. नियमानुसार पहिला हप्ता 1 एप्रिलपासून 31 जुलैच्या दरम्यान कधीही येऊ शकतो.

लिस्टमध्ये असे चेक करा नाव-

1. सर्वप्रथमच अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.

2. होमपेजवर Farmers Corner चा ऑपशन दिसेल.

3. Farmers Corner सेक्शनमध्ये Beneficiaries List ऑपशनवर क्लिक करा.

4. नंतर ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.

5. यानंतर Get Report वर क्लिक करा. नंतर लाभार्थ्यांची पूर्ण लिस्ट समोर येईल, ज्यामध्ये तुमचे नाव शोधा.

पैसे येण्यास उशीर का झाला.

कोरोना संकटामुळे लाभार्थ्यांची व्हेरिफिकेशनची प्रक्रिया उशीराने होत आहे. तसेच ज्या अपात्र शेतकर्‍यांनी अगोदर याचा लाभ घेतला होता, त्यांच्याकडून पैशाची वसूली सुरू झाली आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 9.5 कोटी शेतकर्‍यांना पहिला हप्ता म्हणून एकुण 19,000 कोटी रुपये जमा केले जातील.

पीएम किसानसाठी रजिस्ट्रेशनची प्रोसेस

1. PM Kisan च्या ऑफिशियल वेबसाईटवर जा.

2. आता Farmers Corner वर जा.

3. येथे New Farmer Registration च्या पर्यायावर क्लिक करा.

4. यानंतर आधार नंबर टाकावा लागेल. सोबतच कॅप्चा कोड टाकून राज्य निवडा आणि नंतर प्रोसेस पुढे न्यावी लागेल.

5. या फॉर्ममध्ये तुमची संपूर्ण व्यक्तिगत माहिती भरा.

6. सोबतच बँक अकाऊंटची माहिती आणि शेतीशी संबंधीत माहिती भरा. यानंतर फॉर्म सबमिट करा.