PM-Kisan | मोठी खुशखबर ! 9.5 शेतकर्‍यांच्या खात्यात आला 9वा हप्ता, चेक करा तुमच्या अकाऊंटमध्ये आलेले पैसा?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM Kisan Scheme Samman Nidhi) चा 9 वा हप्ता (PM Kisan 9th installment) 9.5 कोटी शेतकर्‍यांना पीएम मोदींच्या हस्ते जारी करण्यात आला. या हप्त्यात सरकारने 19500 कोटी रुपये जारी केल्याचा (PM-Kisan) दावा केला आहे. या योजनेत सरकार शेतकर्‍यांच्या खात्यात वार्षिक 6000 रुपये ट्रान्सफर करते.

पीएम मोदी (PM Modi) यांनी या दरम्यान म्हटले, आज पीएम किसान सम्मान निधी योजनेच्या अंतर्गत 9.75 कोटी शेतकर्‍यांना 19,509 कोटी रुपयांची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली आहे. काही दिवसातच आपण 75वा स्वतंत्र्य दिन साजरा करणार आहोत. हा महत्वाचा टप्पा आपल्यासाठी गौरवाचा आहे आणि ही नवीन संकल्प, नवीन लक्ष्याची सुद्धा संधी आहे. यानिमित आपल्याला हे ठरवायचे आहे की, येत्या 25 वर्षात भारताला आपल्याला कुठे पहायचे आहे.

पीएम मोदी म्हणाले, देश जेव्हा स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण करेल, 2047 मध्ये तेव्हा भारताची स्थिती काय असेल, हे ठरवण्यात आपली शेती, आणि आपल्या शेतकर्‍यांची मोठी भूमिका आहे. भारताच्या शेतीसाठी हा आव्हानाचा काळ आहे.

त्यांनी म्हटले, सरकार शेतकर्‍यांना नवीन उत्पन्नाचे तंत्र देण्यासाठी प्रतिबद्ध आहे. आम्ही 700 कोटी रुपयांचे मध एक्सपोर्ट केले आहे. काश्मीरचे केसर तर जगप्रसिद्ध आहे. आता देशभरात नाफेडच्या दुकानांवर सुद्धा उपलब्ध होईल.

भारताची इतर कोठारे भरलेली – पीएम मोदी
पंतप्रधानांनी म्हटले, शेतकर्‍यांना आम्ही मदत केल्याने भारतीची इतर कोठरे भरलेली आहेत. साखर, गहू, तांदूळातच आत्मनिर्भरता पुरेशी नाही, तर डाळ आणि तेलात सुद्धा आत्मनिर्भरता शेतकरी करून दाखवतील.

पीएम मोदी म्हणाले, मिशनच्या माध्यमातून खाद्यतेलाशी संबंधित इकोसिस्टमवर 11 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. सरकार शेतकर्‍यांना उत्तम बियाणे, टेक्नॉलॉजी आणि इतर सुविधा देणार आहे. आपल्याला खाद्यतेलात देश आत्मनिर्भर होण्यासाठी वेगाने काम करायचे आहे.

पीएम मोदी यांनी म्हटले, सरकारने खरीफ असो की रब्बी हंगाम, शेतकर्‍यांकडून एमएसपीवर आतापर्यंतची मोठी खरेदी केली आहे. यामुळे धान्य उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यात जवळपास 1 लाख 70 हज़ार कोटी रुपये आणि गेहू उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यात जवळपास 85 हजार कोटी रुपये थेट पोहचले आहेत.

 

लिस्टमध्ये असे चेक करा आपले नाव

1. सर्वप्रथम https://pmkisan.gov.in वेबसाइटवर व्हिजिट करा.

2. होमपेजवर Farmers Corner च्या ऑपशनमध्ये Beneficiaries List वर क्लिक करा.

4. ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उप जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.

5. नंतर Get Report वर क्लिक केल्यावर लाभार्थींची पूर्ण यादी समोर येईल, त्यामध्ये तुमचे नाव तपासा.

या नंबरवर संपर्क करून सुद्धा हप्त्याबाबत जाणून घ्या –

PM Kisan टोल फ्री नंबर : 18001155266

पीएम किसान हेल्पलाईन नंबर :155261

PM Kisan लँडलाईन नंबर्स : 011्र23381092, 23382401

पीएम किसान नवीन हेल्पलाईन : 011-24300606

पीएम किसानची आणखी एक हेल्पालाईन : 0120-6025109

ई-मेल आयडी : [email protected]

Web Title :- pm kisan scheme samman nidhi 9th installment issue check your money status

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | जिल्हा न्यायालयाकडून अ‍ॅड. सागर ऊर्फ राजाभाऊ सुर्यवंशी फरार घोषित

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 119 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Mahavikas Aghadi | …तर स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी होणार नाही; काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादीचाही स्वबळाचा नारा