Twitter वर मंदिरासंदर्भात विचारला गेला प्रश्न, PM मोदींनी दिलं उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटर (Twitter) नेहमी लोकांना बांधून ठेवते. प्रत्येक क्षणाला आपल्याला येथे नवीन माहिती मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) देखील ट्विटरवर खूप सक्रिय असतात. ट्विटरवर त्यांचे दोन अकाउंट देखील आहेत. पहिले म्हणजे पंतप्रधान कार्यालयाच्या नावाने (PMO) आणि दुसरे आहे ते स्वतःच्या नावाने. शुक्रवारी एका वापरकर्त्याने मंदिराचा फोटो टाकून लोकांना ते ओळखण्याचे आव्हान केले. काही तासांनंतर पंतप्रधान मोदींनी याचे उत्तर देऊन सर्वांना चकित केले. विशेष म्हणजे स्वत: पंतप्रधान मोदींनी तीन वर्षांपूर्वी हा फोटो शेअर केला होता.

वास्तविक, लॉस्ट टेंपल्स नावाच्या ट्विटर अकाउंटने तो फोटो शेअर केला. यात नदीच्या घाटाच्या काठावर मंदिर दिसत होते आणि येथे गंगा आरती देखील केली जात होती. हा भव्य फोटो शेअर करताना वापरकर्त्याने अमेरिकेचे लेखक मार्क ट्वेन यांनी संबंधित शहराबद्दल लिहिलेल्या शब्दांचा संदर्भ देत लिहिले, इतिहासापेक्षा जुने, परंपरांपेक्षा जुने, आख्यायिकांपेक्षा जुने आहे आणि जेव्हा यांना एकत्र केले तर त्याहीपेक्षा हे जुने आहे. आपण हे शहर ओळखू शकता का?

पंतप्रधान मोदींनी दिलं उत्तर
थोड्याच वेळात पंतप्रधान मोदींनी याचे उत्तर देऊन सर्वांना चकित केले. त्यांनी लिहिले, ‘मला आठवत आहे की मी काही वर्षांपूर्वी हा फोटो शेअर केला होता. हे काशीचे रत्नेश्वर महादेव मंदिर आहे.’

लॉस्ट टेम्पल्स अकाउंटला फॉलो करणाऱ्या पीएम मोदींनी 2017 मध्ये देव दिपावलीवर काशीतील फोटो शेअर केले होते. हा फोटो त्यापैकीच एक होता. काही मिनिटांत पंतप्रधानांच्या ट्विटला हजारो लाईक्स मिळू लागले आणि त्यांची ही पोस्ट व्हायरल झाली.