PM Modi Biopic | अमिताभ बच्चन साकारणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका; नवीन जीवनपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस

पोलीसनामा ऑनलाइन – PM Modi Biopic | जागतिक स्तरावरील प्रमुख नेता व देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट निर्मित (PM Modi Biopic) केला आहे. नरेंद्र मोदी हे सध्या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसत आहेत. अशा त्याच्या आयुष्यातील वैविध्यपूर्ण घटनांवर आधारित चित्रपट बनवण्यात येणार आहे. या चित्रपटामध्ये नरेंद्र मोदी यांची प्रमुख भूमिका बॉलीवुडचे बीग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) साकारणार आहेत. अमिताभ बच्चन हे नरेंद्र मोदींच्या भूमिकेला न्याय़ देऊ शकतात यांमुळे ते नरेंद्र मोदी यांची पडद्यावर भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती प्रेरणा अरोरा (Prerna Arora) करणार आहे.

प्रसिद्ध चित्रपट निर्माती प्रेरणा अरोरा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावी व्यक्तीमत्त्वामुळे प्रेरित झाल्या. नरेंद्र मोदी यांचं रुबाबदार, देखणं व प्रेरणादायी चरित्र त्यांना आवडल्याने त्यांनी हा बायोपिक करण्याचा निर्णय घेतला आहे. या जीवनपटामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख भूमिकेमध्ये अमिताभ बच्चन झळकणार आहेत. प्रेरणाने या आधी ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ (Toilet: Ek Prem Katha) व ‘परी’ (Pari) सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. लवकरच तिचा हा नवीन भव्य प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रेरणाने तिचे नरेंद्र मोदी यांच्या जीवनपटाबद्दलचे मत मांडले आहे. ती म्हणाली की, मोदींपेक्षा मोठा हिरो मी पाहिलेला नाही. मोदींची भूमिका साकारण्यासाठी अमिताभ बच्चन हे सर्वात योग्य अभिनेते आहेत. नरेंद्र मोदींनी ज्या प्रकारे महामारीचा सामना केला आहे, त्यामुळे ते मार्वलच्या सुपरहिरोपेक्षा मोठे आहेत. विवेक ओबेरॉय यांचा सिनेमा मी पाहिलेला नाही. पण माझा सिनेमा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना न्याय देणारा असेल.” (Narendra Modi Biopic)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित बनवला जाणारा हा काही पहिला चित्रपट नाही. यापूर्वी अनेक चित्रपटांच्या व वेबसिरीजच्या माध्यामातून नरेंद्र मोदी यांचे आयुष्य सामान्य नागरिकांसमोर मांडण्यात आले आहे, त्याचे राजकारण, हलाखीची परिस्थिती व त्यामधून त्यांनी साकारलेले स्वप्न आणि त्यानंतर देशाला भव्यता प्रदान करणारे व्हिजन देण्याचे महत्त्वपूर्ण काम असे अनेक त्यांच्या आयुष्यातील पैलू मांडणारे चित्रपट यापूर्वी आले आहेत. 2019 साली ‘मोदी: जर्नी ऑफ अ कॉमन मॅन’ (Modi: Journey of a Common Man) ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) याची प्रमुख भूमिका असलेला ‘पीएम मोदी’ (PM Modi) हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
आता प्रेक्षकांसाठी प्रेरणा नवीन चित्रपट घेऊन येणार आहे.
यामध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची भूमिका लक्षवेधी ठरत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lust Stories 2 | लस्ट स्टोरीज् 2 मधील अंगद बेदीच्या बोल्ड सीनवर काय़ म्हणाली पत्नी नेहा धूपिया?