…म्हणून जम्मू-काश्मीरच्या आरिफाकडं सोपवलं PM मोदींनी सोशल मीडिया अकाऊंट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज अंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमित्त पीएम मोदी यांनी आपले सोशल मीडिया अकाउंट महिलांना समर्पित केले. जम्मू कश्मीरच्या श्रीनगरमध्ये राहणारी आरिफा सुद्धा त्या सात महिलांपैकी एक आहे, ज्यांना पीएम मोदींनी आपले सोशल मीडिया अकाउंट हँडल करण्याची संधी दिली आहे. आरिफाने क्राफ्ट मॅनेजमेन्टचा कोर्स केला आहे. तसेच जम्मू काश्मीरच्या शिल्पकलेला पुढ नेण्यासाठी ती काम करत आहे. तिने पीएम मोदी यांच्या या उपक्रमाला धन्यवाद दिले आहेत.
जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवल्यानंतर आणि जम्मू काश्मीर आणि लडाखला दोन वेगवेगळी केंद्रशासित राज्य बनवल्यानंतर पीएम मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना अनेक लोकांनी विरोध केला. हे प्रकरण यूएनपर्यंत सुद्धा गेले. परंतु, भारताने हा आमचा अंतर्गत विषय असल्याचे म्हटले. जे शेवटी यूएनने सुद्धा स्वीकारले. देशातील अनेक लोक केंद्र सरकारच्या या निर्णयाने खुश झाले तर अनेकजणांनी नाराजी व्यक्त केली होती.
370 वर कारवाई
या पार्श्वभूमीवर अंतरराष्ट्रीय महिला दिनी पीएम मोदी यांनी जम्मू काश्मीरच्या एका सशक्त महिलेला आपले ट्विटर अकाउंट सोपवणे महत्वपूर्ण आहे. केंद्र सरकारचा दावा आहे की, 370 वर कारवाई केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये शांतता आहे आणि राज्य विकासाच्या मार्गावरून पुढे जात आहे. आरिफा पीएम मोदी यांच्या या उपक्रमाबद्दल खुप आनंदीत आहे. तिने याबद्दल पीएम मोदींना धन्यवाद दिले आहेत.
पीएमच्या अकाउंटवरून आरिफाचे पहिले ट्विट
आरिफाने पीएम मोदी यांचे ट्विटर अकाउंट सांभाळल्यानंतर ट्विट केले की, पीएम मोदी यांच्या या उपक्रमाने माझे मनोबल वाढवले आहे. हे मला शिल्पकलेसह संपूर्ण काश्मीरच्या कारागिरांना मदत करेल. मला वाटते की, अधिक महिलांना स्वावलंबी बनवण्यावर लक्ष केंद्रीत करणे आणि अन्य महिलांना मदत करणे महत्वपूर्ण आहे.
I always dreamt of reviving the traditional crafts of Kashmir because this is a means to empower local women.
I saw the condition of women artisans and so I began working to revise Namda craft.
I am Arifa from Kashmir and here is my life journey. #SheInspiresUs pic.twitter.com/hT7p7p5mhg
— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2020
तिने अन्य एका ट्विटमध्ये लिहिले की, जेव्हा परंपरा अधुनिकतेला भेटते तेव्हा चमत्कार होऊ शकतो. मी माझ्या कामात याचा अनुभव घेतला आहे. माझी पहिली व्यावसायिक वाटचाल नवी दिल्लीतील हस्तकला वस्तूंच्या प्रदर्शनात भाग घेतल्यानंतर सुरू झाली होती. या प्रदर्शनाने चांगले ग्राहक आणि एक टर्नआव्हरला आकर्षित केले.
पारंपरिक शिल्पकलेचे काम करते आरिफा
आरिफा काश्मीरच्या पारंपरिक शिल्पकला क्षेत्रात काम करते. ती क्राफ्ट मॅनेजमेंट शिकली आहे. तिचे म्हणणे आहे की, मी काश्मीमध्ये राहून काश्मीरसाठी काम करणार आहे. तिला काश्मीरची शिल्पकला जगात प्रसिद्ध करायची आहे, ज्यासाठी ती कामही करत आहे.