PM Modi | 75 आठवड्यात 75 वंदे भारत ट्रेन, सैनिकी शाळांमध्ये मुलींना सुद्धा प्रवेश; लाल किल्ल्यावरून PM मोदी यांनी केल्या ‘या’ 10 मोठ्या घोषणा

नवी दिल्ली : PM Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना आगामी विकासाची रूपरेषा मांडली. त्यांनी (PM Modi) म्हटले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या 75 आठवड्यांमध्ये देशात प्रत्येक आठवड्यात एक वंदेभारत ट्रेन सुरू करण्यात येईल.

मोदींनी यासोबतच सैनिक शाळांमधून विद्यार्थीनींना सुद्धा प्रवेश देण्याची घोषणा केली. ते म्हणाले, आता सरकारने ठरवले आहे की, देशाच्या सर्व सैनिकी शाळा मुलींना सुद्धा खुल्या केल्या जातील.
Pune Inspector Transfer | पुण्यामधील विविध पोलीस अस्थापनांवरील 45 पोलीस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या, काही जणांना मुदतवाढ

पंतप्रधानांनी केलेल्या 10 मोठ्या घोषणा…

– 75 आठवड्यात 75 वंदेभारत ट्रेन

मोदी म्हणाले, देशाने संकल्प केला आहे स्वातंच्या अमृत महोत्सवाच्या 75 आठवड्यात 75 वंदेभारत ट्रेन देशाच्या प्रत्येक कोपरा जोडतील. इन्फ्रास्ट्रक्चर निर्मितीमध्ये होलिस्टिक अ‍ॅप्रोच अवलंबण्याची आवश्यकता आहे. भारत आगामी काळात पंतप्रधान गतीशक्ती-नॅशनल मास्टर प्लान लाँच करणार आहे.
IND vs ENG | KL Rahul वर इंग्लंडच्या प्रेक्षकांनी फेकली दारूच्या बाटलीची झाकणं, भडकलेल्या Virat Kohli ने दिली अशी रिअ‍ॅक्शन

– 14 ऑगस्ट विभाजन वेदना स्मृतीदिन

पीएम म्हणाले, फाळणीच्या जखमा आजही हिंदुस्थानच्या हृदयाला वेदना देत आहेत. कालच देशाने भावनिक निर्णय घेतला आहे. आता 14 ऑगस्ट विभाजन वेदना स्मृतीदिन म्हणून स्मरणात ठेवला जाईल.

– यापूर्वी छोटे शेतकरी दुर्लक्षित आता त्यांच्यासाठी निर्णय

ते म्हणाले, आपल्या छोट्या शेतकर्‍यांची शक्ती वाढवायची आहे. त्यांना नवीन सुविधा द्याव्या लागतील. 80 टक्के शेतकरी असे आहेत ज्यांच्याकडे 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. यापूर्वी देशात जी धोरणे होती त्यामध्ये छोट्या शेतकर्‍यांकडे लक्ष दिले गेले नाही. आता याच शेतकर्‍यांना लक्षात घेऊन निर्णय घेतले जात आहेत.

Maharashtra Police Transfer | राज्यातील बहुप्रतिक्षित पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त; 1462 पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकांच्या ‘ट्रान्सफर’

– कमजोर वर्गाला प्राधान्य

पंतप्रधान म्हणाले, सर्वांच्या सामर्थ्याला योग्य संधी देणे, हिच लोकशाहीची खरी भावना आहे. यासाठी जो वर्ग मागे आहे, त्यांना आपल्याला हात द्यायचा आहे. लाल किल्ल्यावरून मी आवाहन करतो की – सबका साथ-सबका विकास-सबका विश्वास आणि सबका प्रयास आपल्या प्रत्येक लक्ष्यासाठी महत्वाचा आहे.

– आधुनिक गावांची निर्मिती, रस्ते, वीज देणार

पंतप्रधान म्हणाले, देशात 110 पेक्षा जिल्ह्यांमध्ये शिक्षण, आरोग्य, पोषण, रस्ते, रोजगाराच्या योजनांना प्राथमिकता दिली जात आहे. गावांपर्यंत रस्ते आणि वीज पोहचवण्याचे काम सुरू आहे. गावांपर्यंत ऑप्टिकल फायबर नेटवर्क, डाटाची ताकद पोहचत आहे, इंटरनेट पोहचत आहे. गावे सुद्धा डिजिटल व्यवसाय तयार करत आहेत.

– महिला गटांसाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म

पीएम मोदी म्हणाले, गावात ज्या आमच्या सेल्फ हेल्प ग्रुपच्या 8 कोटी भगिनी आहेत त्या एकापेक्षा एक प्रॉडक्ट बनवत आहेत. त्यांच्या प्रॉडक्टला देश आणि परदेशात मोठा बाजार मिळत आहे. यासाठी सरकार आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार करणार आहे.

Home Finance | आता कामगार सुद्धा खरेदी करू शकणार आपले घर, ICICI होम फायनान्सने सुरू केली ‘ऑन-द-स्पॉट’ होम लोनची सुविधा

– सरकारी योजनेतील तांदूळ फॉर्टिफाय करणार

त्यांनी घोषणा केली की, केंद्र सरकार आपल्या वेगवेगळ्या योजनांतर्गत गरीबांना जो तांदूळ देते, त्यास फॉर्टिफाय करेल, गरीबांना पोषणयुक्त तांदूळ देईल. रेशनच्या दुकानावर मिळणारे तांदूळ असो की मिड डे मीलमध्ये मिळणारे तांदूळ असोत, 2024 पर्यत प्रत्येक योजनेच्या माध्यमातून मिळणारे तांदूळ फॉर्टिफाय केले जातील.

– सर्व पूर्वात्तर राज्य रेल्वेने जोडणार

नॉर्थ ईस्टबाबत पंतप्रधान म्हणाले, पूर्वोत्तरमध्ये कनेक्टिव्हिटीचा नवीन इतिहास रचला जात आहे. लवकरच नॉर्थ ईस्टच्या सर्व राज्यांच्या राजधान्यांना रेल्वेने जोडण्याचे काम पूर्ण होणार आहे. आपला पूर्व भारत, नॉर्थ ईस्ट, जम्मू-काश्मीर, लडाखसह संपूर्ण हिमालयाचे क्षेत्र असो, आपला कोस्टल बेल्ट किंवा आदिवासी पट्टा असो, हे भविष्यात भारताच्या विकासाचे आधार बनतील.

Delivery Scam on WhatsApp | व्हॉट्सअ‍ॅपवर सुरू झालंय डिलिव्हरी ‘स्कॅम’, एक चूक अन् रिकामं होईल बँक अकाऊंट; जाणून घ्या

– जम्मू-काश्मिरमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी तयारी

पंतप्रधान म्हणाले, केंद्रशासित प्रदेश लडाखसुद्धा विकासाकडे चालला आहे. आधुनिक
इन्फ्रास्ट्रक्चरसह सिंधु सेंट्रल युनिव्हर्सिटी लडाखला उच्च शिक्षणाचे केंद्र बनवले जात आहे. जम्मू-
कश्मीरच्या विकासाचे संतुलन आता स्थिर दिसत आहे. जम्मू काश्मीरमध्ये डी-लिमिटेशन कमीशन
गठित केले आहे आणि भविष्यात विधानसभा निवडणुकांसाठी तयारी सुरूआहे.

Corona Vaccination in Maharashtra | राज्याने नोंदवला लसीकरणाचा नवा विक्रम !

– मिझरोममध्ये पहिल्यांदा मुलींना सैनिकी शाळेत प्रवेश

पीएम म्हणाले, आज मी आनंदी आहे देशवासीयांसमोर मनोगत व्यक्त करत आहे. मला लाखो
कन्यांकडून संदेश मिळत होते की त्यांना सुद्धा सैनिकी शाळेत शिकायचे आहे, त्यांच्यासाठी सैनिकी
शाळांचे दरवाजे आता खुले आहेत. दोन अडीच वर्ष अगोदर मिझोरामच्या सैनिक शाळेत पहिल्यांदा
मुलींना प्रवेश देण्याचा प्रयोग करण्यात आला होता. आता सरकारने ठरवले आहे की देशातील सर्व
सैनिकी शाळा मुलींसाठी खुल्या केल्या जातील.

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  PM Modi | independence day 2021 pm modi 10 announcement vande bharat trains azadi ka amrit mahotsav

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update