Delivery Scam on WhatsApp | व्हॉट्सअ‍ॅपवर सुरू झालंय डिलिव्हरी ‘स्कॅम’, एक चूक अन् रिकामं होईल बँक अकाऊंट; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Delivery Scam on WhatsApp | जेव्हापासून जगात कोरोना व्हायरसची महामारी पसरली आहे, तेव्हापासून ऑनलाइन घोटाळे वाढले आहेत. सिक्युरिटी रिसर्चर्सने यूजर्सला एका नवीन डिलिव्हरी स्कॅमबाबत (Delivery Scam on WhatsApp) इशारा दिला आहे जो वेगाने पसरत आहे. स्कॅमर व्हॉट्सअपच्या मध्यमातून मॅलिशियस लिंकचा मेसेज पाठवतात आणि यूजर्सला त्यांच्या ऑनलाइन ऑर्डरबाबत नोटिफाय करतात. यानंतर यूजर स्कॅमला बळी पडतात आणि बँकेतील आपली सर्व जमा रक्कम गमावतात. यासाठी कोणत्याही लिंकवर ताबडतोब विश्वास ठेवू नका.

Kaspersky लॅबच्या रशियन सिक्युरिटी रिसर्चर्सने पॅकेज डिलिव्हरी घोटाळ्याबाबत इशारा जारी केला आहे जे वेगाने वाढत आहेत. यात म्हटले आहे की, अटॅकर ऑनलाइन डिलिव्हरी कंपन्यांचे अधिकारी म्हणून समोर येतात. नंतर ते त्या व्यक्तीला एका पॅकेजबाबत नोटिफाय करतात ज्यास त्यांच्या लोकेशनपर्यंत पोहचण्याची आवश्यकता असते. मात्र, ही प्रोसेस इतकी सहज नाही जेवढी दिसते.

सायबर क्रिमिनल तेव्हा यूजर्सला प्रोसेस पूर्ण करण्यासाठी मेसेजसोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करण्यास सांगतात. त्यांना हे ठरवण्यासाठी एक छोटे पेमेंट करण्यास सांगितले जाते की, प्रॉडक्ट सुरक्षित प्रकारे त्यांच्या लोकेशनपर्यंत पोहचवले जाईल.

डिलिव्हरीसाठी मागितले जातात पैसे
Kaspersky लॅबने म्हटले, रिसिव्हद्वारे पेमेंटची डिमांड करणारी अनएक्सपेक्टेड पार्सल या मागील तिमाहीत सर्वात जास्त कॉमन स्कॅमपैकी एक होते. ‘मेल कंपनी’च्या चलानचे कारण सीमा शुल्कपासून शिपमेंट खर्चापर्यंत काहीही असू शकते. सर्व्हिससाठी पेमेंट करण्याचा प्रयत्न करतेवेळी यूजर्सला एक बनावट वेबसाइटवर नेले गेले, जिथे त्यांनी पैसे गमावण्याची जोखीम घेतली (जे ईमेलमध्ये लिहिलेल्या पेक्षा खुप जास्त असू शकते) तसेच त्यांच्या बँक कार्डच्या डिटेल सुद्धा अ‍ॅक्सेस होण्याची जोखीम घेतली.

जेव्हा यूजर लिंकवर क्लिक करतो, तेव्हा त्यास एका बनावट वेबसाइटवर नेले जाते, जिथे त्यास छोटे पेमेंट करण्यासाठी आपल्या बँक डिटेल नोंदवण्यास सांगितले जाते. असे तेव्हा होते जेव्हा ग्राहकाला आपल्या ऑनलाइन ऑर्डरबाबत काहीही लक्षात नसते.

 

या गोष्टी लक्षात ठेवा

– जेव्हा Amazon किंवा Flipkart वरून काही खरेदी करता तेव्हा तुम्हाला माहित असते की तुम्ही काय ऑर्डर केले आहे आणि पार्सल केव्हा डिलिव्हर केले जाईल.
असे यासाठी कारण तुमच्याकडे अ‍ॅपवर एक ट्रॅकर आहे आणि तुम्हाला प्रॉडक्टच्या स्टेटसबाबत नोटिफिकेशन सुद्धा मिळते.

कोणतीही कंपनी सुरक्षित डिलिव्हरीसाठी कधीही पेमेंट करण्यास सांगणार नाही, जरी तुम्ही पेमेंटसाठी कॅश ऑन डिलिव्हरी पर्याय निवडला असेल.

ऑर्डर अगोदर तुम्हाला डिलिव्हर केली जाईल आणि नंतर पेमेंट करू शकता.
किंवा तुम्ही तुमच्या वॉलेट किंवा कार्डचा वापर करण्यापूर्वी पैशांचे पेमेंट करू शकता.
तुमच्याकडून कोणतेही जास्त पेमेंट घेतले जाणार नाही मग काहीही होवो.

अशा इमेल ईमेलपासून नेहमी सावध रहा आणि नेहमी मेसेजच्या सोर्सची तपासणी करा.

कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, ज्यामध्ये वेबसाइटचा योग्य अ‍ॅड्रेस संशास्पद असेल.

Web Title :-  delivery scam on whatsapp one mistake can rob all your bank savings

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Dr. Amol Kolhe | डॉ. अमोल कोल्हेंनी केला कट्टर विरोधक आढळराव पाटलांना फोन, म्हणाले… (व्हिडीओ)

Police News | चेक पोस्टवर पोलीस कर्मचार्‍याला चिरडून पळाला कार चालक, पाहा धक्कादायक व्हिडीओ

Pune Police | सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर