Corona Vaccination in Maharashtra | राज्याने नोंदवला लसीकरणाचा नवा विक्रम !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण (Corona Vaccination in Maharashtra) करण्यात येत आहे. कोरोना लसीकरणाच्या मोहिमेत आज स्वातंत्र्य दिनाच्या (Independence Day) पूर्वसंध्येला राज्याने एक विक्रम नोंदवला आहे. दिवसभरात सायंकाळी सात वाजेपर्यंत 9 लाख 36 हजार नागरिकांचे लसीकरण (Corona Vaccination in Maharashtra) करण्यात आले आहे. एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याची ही पहिलीच वेळ असून आजवरचा हा सर्वाधिक आकडा आहे. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. लसींचा पुरवठा सुरळीत राहिल्यास राज्यात अशाच मोठ्या संख्येने नागरिकांचे लसीकरण होऊ शकते. दिवसाला किमान दहा लाख लसीकरण करण्याची क्षमता राज्याची असून आज झालेल्या विक्रमी लसीकरणाने हे सिद्ध झाले आहे. यापुढे असेच विक्रमी संख्येने लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा (Health system) प्रयत्नशील राहील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास (Dr. Pradeep Vyas) यांनी सांगितले की, आज सायंकाळी सात वाजेपर्यंत 9 लाख 36 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये वाढ होऊ शकते. यापूर्वी 3 जुलै रोजी 8 लाख 11 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते. त्यावेळी लसीकरणाचा विक्रम नोंदवण्यात आला होता. मात्र, आज तो विक्रम मोडित निघाला असून नवा विक्रम झाला असल्याचे डॉ. व्यास यांनी सांगितले.

हे देखील वाचा

Maharashtra Police Transfer | राज्यातील बहुप्रतिक्षित पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त; 1462 पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकांच्या ‘ट्रान्सफर’

Pune Inspector Transfer | पुण्यामधील विविध पोलीस अस्थापनांवरील 45 पोलीस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या, काही जणांना मुदतवाढ

Sudhir Mungantiwar | वाघाच्या गुहेत जाऊन नार्वेकरांना धमकी देणारा आहे तरी कोण?

IT Refund | प्राप्तीकर विभागाने 9 ऑगस्टपर्यंत करदात्यांना पाठवले 47318 कोटी रुपये

Bombay High Court | नव्या ‘आयटी’ नियमांसंबंधी मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Corona Vaccination in Maharashtra | maharashtra sets new record in corona vaccination

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update