PM Modi On Sharad Pawar | ‘शरद पवारांना पंतप्रधान होता आलं नाही, कारण…’, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान

‘एनडीए’च्या खासदारांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Modi On Sharad Pawar | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना नुकताच पुण्यामध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने (Lokmanya Tilak National Award) सन्मानीत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) हेही उपस्थित होते. शरद पवार यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यासंदर्भात मोठं विधान केलं आहे. (PM Modi On Sharad Pawar)

काँग्रेसमुळे (Congress) शरद पवार यांना पंतप्रधान होण्याची संधी मिळली नाही, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिले आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील (National Democratic Alliance(NDA) खासदारांशी (Maharashtra NDA MP) मोदींनी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे विधान केले. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही निशाणा साधला. (PM Modi On Sharad Pawar)

पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेसमधील घराणेशाहीच्या राजकारणामुळे शरद पवार यांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही. तसेच शरद पवार आणि काँग्रेसने अनेक राजकीय क्षमता असलेल्या नेत्यांना डावलण्याचं काम केलं. सत्तेत असताना चुकीची कामे करणाऱ्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला. नंतर निवडणूक प्रचारावेळी या नेत्यांनी केलेल्या चुकांची माफीही मागितली. काँग्रेसप्रमाणे भाजपा (BJP) अहंकारी नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2024) एनडीचा विजय होईल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

भाजपाने नाहीतर शिवसेनेने युती तोडली

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला बोल केला. भाजपाने नाहीतर शिवसेनेने (Shivsena)
युती तोडली. विनाकारण वाद निर्माण करण्यात आले, तरीही आम्ही ते सहन केलं. एकीकडे सत्तेत राहयचं आणि दुसरीकडे टीका करायची, हे कसं चालणार? असं मोदी म्हणाले.

तसेच बिहारमध्ये 2020 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Elections) भाजपला 74 जागा
आणि जनता दल युनायटेडला (JDU) 43 जागा मिळाल्या होत्या. तरीही, नीतीश कुमार (CM Nitish Kumar) यांना
मुख्यमंत्री करण्यात आल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Narendra Modi | ‘ठाकरेंनीच महाराष्ट्रात युती तोडली, भाजपने नाही’; पंतप्रधान मोदींचं मोठं विधान

Maharashtra Rain | महाराष्ट्रात 10 ऑगस्टपर्यंत कुठेही तीव्र हवामानाचा इशारा नाही

Mahesh Babu | दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूच्या नावावर आहे असा ‘विक्रम’ जो आत्तापर्यंत कोणत्याही अभिनेत्याला मोडता आलेला नाही