बदलणार आहे का मोदींचे कॅबिनेट? पीएमने 4 दिवसांत या मंत्रालयांचे केले पुनरावलोकन

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकेंद्रीय कॅबिनेटमध्ये (Central cabinet) एका मोठ्या बदलाची तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आता स्वता मंत्रालयांच्या (Ministry) कामकाजांचे पुनरावलोकन करत आहेत. असे मानले जात आहे की, लवकरच कॅबिनेटमध्ये (Cabinet) फेरबदल होऊ शकतात. मोदींच्या सोबत या बैठकांमध्ये भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा (BJP president J. P. Nadda) आणि गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) सुद्धा उपस्थित होते.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

माहितीनुसार, मागील चार दिवसांपासून पीएम सर्व मंत्रालयांच्या (Ministry) कामकाजाचा आढावा घेत आहेत. पीएम मोदी (PM Modi) छोट्या-छोट्या मंत्री गटांसह सर्व मंत्रालयांचे पुनरावलोकन करत आहेत. मंत्र्यांसोबत त्यांच्या मंत्रालयांच्या कामकाजाच्या पुनरावलोकनाकडे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या (Union Cabinet) फेरबदलापूर्वीची एक्सरसाईज म्हणून पाहिले जात आहे. पीएम मोदी (PM Modi) यांच्यासह या बैठकीत भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा (BJP president J. P. Nadda) असत. काल मंत्र्यांसोबतच्या बैठकीत गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) सुद्धा होते.

अनुप्रिया पटेल (Anupriya Patel) यांची लागू शकते वर्णी

कॅबिनेटमध्ये फेरबदलाची शक्यता यासाठी प्रबळ होत आहे.
कारण युपी निवडणुकीसाठी (UP elections) गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांनी सुद्धा युपीच्या काही प्रादेशिक पक्षांशी चर्चा केली आहे.
ज्यामध्ये आपना दलाच्या अनुप्रिया पटेल (Anupriya Patel) सुद्धा आहेत.
अनुप्रिया पटेल मागील मोदी कॅबिनेटमध्ये (Modi Cabinet) आरोग्य राज्यमंत्री (Minister of State for Health) होत्या.
परंतु दुसर्‍या कार्यकाळात त्यांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळाले नाही.
युपी निवडणुकीपूर्वी अनुप्रिया पटेल यांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळू शकते.

आतापर्यंत या मंत्रालयांचे झाले पुनरावलोकन
सूत्रांनुसार, अजूनपर्यंत कृषी, ग्रामीण विकास मंत्रालय, कोळसा आणि उत्खनन, पेट्रोलियम, स्टील, शहरी विकास मंत्रालय, नागरि उड्डयन मंत्रालय, रेल्वे, सांस्कृतिक, पर्यटन, जनजातीय कार्य मंत्रालय, मत्स्यपालन, पशुपालन आणि डेअरी मंत्रालय, पर्यावरण, रस्ते आणि परिवहन, स्किल डेव्हलपमेंट आणि उत्तर-पूर्व विकास मंत्रालयांचे पुनरावलोकन करण्यात आले आहे.

Web Title :- pm modi reviews ministries work with amit shah and jp nadda cabinet reshuffle

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

COVID-19 in India : 70 दिवसानंतर कोरोनाच्या सर्वात कमी केस, 24 तासात आली 84 हजार प्रकरणे; 4002 जणांचा मृत्यू

चुकूनही करू नका LIC चे ‘हे’ काम, अन्यथा विमा कंपनी करू शकते कठोर कायदेशीर कारवाई; जाणून घ्या

Adar Poonawalla Security | सुरक्षेची मागणी करताच सुरक्षा पुरवणार, राज्य सरकारची न्यायालयात ग्वाही

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा